बडोदा - आज काश्मीरमध्ये गेल्यास
आपल्याला हिंदु म्हणून ओळख देण्याचीही भीती वाटते. ३०० वर्षे मुसलमान
आक्रमणकर्त्यांना भारतातील पराक्रमी राजांशी लढावे लागले होते. आज हिंदू
संघटित नाहीत, ते धर्माचरण आणि धर्मपालन करत नाहीत, म्हणून आजची विदारक
स्थिती निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन सावरकर मंचाचे श्री. चिरायू पंडित
यांनी केले. येथील पटेलवाडी, मांजलपूर येथे नुकताच हिंदू संघटन मेळावा पार
पडला. या मेळाव्याला हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष आळशी, रणरागिणी
शाखेच्या सौ. अंशू संत उपस्थित होत्या. या मेळाव्याला धर्माभिमानी हिंदूंचा
भरघोस प्रतिसाद मिळाला.
या वेळी श्री. संतोष आळशी यांनी समाजातील दुष्प्रवृत्ती आणि त्याचा
समाजावर होणारा विपरीत परिणाम याविषयी सांगतांना याचा संघटितपणे प्रतिकार
केला पाहिजे, असे सांगितले, तर रणरागिणीच्या सौ. अंशू संत यांनी स्वसंरक्षण
काळाची आवश्यकता विषद करतांना समाजातील असुरक्षिततेची भावना दूर
करण्यासाठी स्वसंरक्षण आणि साधना याचे महत्त्व सांगितले. समितीच्या सौ.
रेखा बर्वे यांनी उपस्थितांना हिंदु जनजागृती समितीचा परिचय करून दिला.
Post a Comment