एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात सनातनचा सहभाग !
श्री. अभय वर्तक |
मुंबई - गणेशमूर्ती ही शाडूच्या मातीची असली पाहिजे, असे
आमचे धर्मशास्त्र सांगते. जेव्हा आपण घरात गणेशाची मूर्ती आणतो, तेव्हा ती
केवळ मातीची मूर्ती नसते, तर त्यात गणेशाचे तत्त्व असते. या मूर्ती कृत्रिम
तलावात विसर्जित करण्याचे प्रशासन, तसेच महानगरपालिका यांच्याकडून लोकांना
आवाहन केले जाते. त्यांचे कार्यकर्ते भाविकांच्या हातातील मूर्ती घेतात,
त्या तलावात विसर्जित करतात. विसर्जन संपल्यानंतर ते त्याच कृत्रिम
तलावातील मूर्ती काढून विहिरी बुजवण्यासाठी वापरतात, किंवा खोल समुद्रात
नेऊन सोडतात. याठिकाणी हिंदूंसाठी गणपति हा काही दगड नाही, तर एक धर्मभावना
आहे. त्यामुळे प्रशासनाने या भावनेचा आदर राखला पाहिजे. खर्या अर्थाने
प्रदूषणविरहित गणेशोत्सव साजरा करायचा असेल, तर ही चळवळ अर्धवट सोडून न
देता पुढच्या वर्षीची सिद्धता आतापासूनच चालू करूया आणि आपण एक दिवस या
देशात असा निश्चितपणे आणूया की, प्रत्येक घरात शाडूच्या मातीच्या मूर्ती
असतील, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी
चर्चासत्रात केले.
एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीकडून पर्यावरणाला हानीकारक ठरणार्या
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी येऊ शकेल का ? आणि गणेशविसर्जन
पर्यावरणपूरक होऊ शकेल का ? या विषयांवर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात
आले होते. या चर्चासत्रात मुंबईचे प्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू, शाडू
मातीचे मूर्तीकार अभिजित धोंडफळे आणि पर्यावरणवादी परिणिता दांडेकर सहभागी
झाल्या होत्या. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन मयुरेश कोण्णूर यांनी केले.
श्री. अभय वर्तक यांनी उघड केली इको
फ्रेण्डली गणेशोत्सवाच्या नावाखाली होणारी फसवणूक !
चर्चासत्रात श्री. अभय वर्तक कृत्रिम तलावांचा फोलपणा दाखवून देतांना
म्हणाले, आपल्याकडे कृत्रिम तलाव नावाचे एक रॅकेट चालवले जाते. या कृत्रिम
तलावांसाठी कोट्यवधी रुपयांचे बजेट बनवले जाते. या कृत्रिम तलावांमध्ये
गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे लोकांना आवाहन केले जाते. त्यानंतर याच मूर्ती
विहिरी बुजवण्यासाठी किंवा खोल समुद्रात विसर्जित केल्या जातात. त्यामुळे
इको फ्रेण्डली गणेशोत्सवाच्या नावाखाली लोकांची फसवणूक होते.
Post a Comment