कृत्रिम हौदाजवळ जमलेले संतप्त हिंदुत्ववादी आणि त्याची पाहणी करतांना स्थानिक भाजप आमदार सुरेश दामू भोळे |
जळगाव - येथे बांधण्यात आलेल्या कृत्रिम हौदात अनंतचतुर्दशीला ४
दिवस उलटून गेल्यावरही गणेशमूर्ती पाण्याअभावी अर्धवट विसर्जित झालेल्या
स्थितीत आढळल्या. गणेशमूर्तींची झालेली ही विटंबना पाहून हिंदुत्वनिष्ठांनी
तेथे रस्ता बंद आंदोलन केले. तसेच महानगरपालिका आयुक्तांवर गुन्हा
प्रविष्ट करण्याची मागणीही केली.
१. येथे महानगरपालिकेच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही ठिकाणी
कृत्रिम हौदाची निर्मिती करण्यात आली होती. अशाच प्रकारचा हौद शिवतीर्थ
मैदानाच्या बाजूलाही तयार करण्यात आला होता.
२. १९ सप्टेंबर या दिवशी उरी येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या विरोधात
काढण्यात आलेल्या मूक मोर्च्यानंतर हिंदुत्वनिष्ठ परतत असतांना त्यांना
त्या हौदात अर्धवट विसर्जन झालेल्या काही गणेशमूर्ती आढळल्या.
३. संतप्त हिंदुत्वनिष्ठांनी तेथे रस्ता बंद आंदोलन केले. कृत्रिम हौदाची
निर्मिती करणार्या महानगरपालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे आणि आर्य चाणक्य
संस्थेचे अध्यक्ष अतुलसिंह हाडा यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
४. या वेळी स्थानिक आमदार सुरेश भोळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी
पालिकेच्या अधिकार्यांना तेथे बोलावून घेतले. त्याच वेळी तेथे पोलीस
अधिकारीही आले. हिंदुत्वनिष्ठांनी त्या गणेशमूर्तींचे विसर्जन शहरातील
मेहरुण तलावात केले.
५. महानगरपालिकेच्या धर्मद्रोही अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी,
अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. अशा प्रकारचे कृत्रिम हौद बांधण्याची
धर्मद्रोही कृती पुन्हा जळगावमध्ये केली जाऊ नये, अशी चेतावणीही त्यांनी
दिली.
६. आंदोलनानंतर शहरात सागर पार्क येथे बांधण्यात आलेल्या कृत्रिम हौदालाही
पोलीस प्रशासनाने भेट दिली. तेथेही मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती विसर्जन न
होता तशाच पाण्यात पडलेल्या दिसून येत होत्या. यावरही हिंदुत्वनिष्ठांनी
तीव्र आक्षेप घेतल्यावर पोलीस प्रशासनाने आयोजकांना हे प्रकरण लवकरात लवकर
मार्गी लावा, अशा सूचना दिल्या.
७. रात्री ११ वाजता महापालिकेच्या अग्निशमन वाहनाच्या साहाय्याने हौदातील
मूर्तींवर पाण्याचा फवारा मारण्यात आला. त्याद्वारे मूर्तींचे विघटन होईल,
असा आयोजकांचा कयास होता; पण तोही निष्फळ ठरला. २० सप्टेंबरला सकाळी मूर्ती
तशाच स्थितीत होत्या.
कृत्रिम हौद म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी आणि ढोंगी
पर्यावरणप्रेमी संघटना यांचा प्रसिद्धीचा कंड शमवून घेण्याचा उपक्रम !
महानगरपालिका आयुक्त जीवन सोनावणे आणि आर्य चाणक्य संस्थेचे अध्यक्ष
अतुलसिंह हाडा, तसेच त्यांच्यासमवेत काही ढोंगी पर्यावरणवादी संस्था यांनी
यावर्षी कृत्रिम हौद निर्मितीचा उपक्रम शहरात राबवला होता. चतुर्दशी
झाल्यावर ४ दिवस होऊनही हौदातील मूर्तींचे विघटन झालेले नव्हते. त्यातील
शिवतीर्थ मैदानाजवळील हौदातील पाणी जिरल्यामुळे तेथे मूर्ती अर्धवट आणि
भंगलेल्या स्थितीत आढळून आल्या. या गोष्टीकडे पालिकेच्या अधिकार्यांंनी
पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. यावरून कृत्रिम हौद या उपक्रमातून
महानगरपालिका आयुक्त, अधिकारी आणि काही ढोंगी पर्यावरणप्रेमी संस्था यांनी
त्यांचा प्रसिद्धीचा कंड शमवून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले जात
आहे.
Post a Comment