BREAKING NEWS

Sunday, September 4, 2016

*अचलपूर शहरात भव्य दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न*

प्रमोद नैकेले /--
*अचलपूर*:-
 

दही हांडी उत्सवात जमलेली गर्दी
श्रीकृष्ण जन्माष्टमी ऊत्सवानीमीत्त संपूर्ण देशात मोठया उत्साहात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते याअनुशंघाने अचलपूरशहरात यावर्षी सिटी लाईट क्लब व साप्ताहिक विश्वरूपम यांचे संयुक्त विद्यमाने भव्य दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
अचलपूर शहरातील गांधीपूल परिसरात सिटी लाईट क्लब व साप्ताहिक विश्वरूपम च्या संयुक्त विद्यमाने ३१ आँगष्ट रोजी जगदंब विद्यालयाचे प्रांगणात भव्य आयोजन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन विश्वरूपमच्या संपादिका रूपाली बुले,सिटी लाईट क्लबचे संचालक अजय लकडे,संदीप टेंभरे,जगदंब शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमाकांत शेरकार,नगरसेवक लक्ष्मी बघेले,माजी नगरसेवक राजू बघेले,सामाजिक कार्यकर्ते हरीश्चद्र मुगल,अत्ताशाहा,नितीन डकरे,श्रिकांत झोडपे,बंटी केजडीवाल व सर्व पत्रकार तसेच जेष्ठ समाजसेवक पुरुषोत्तमजी लकडे व सुरेशभाउ टेंभरे,सरमसपूरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार मुकेश गावंडे आदी मान्यवरांचे उपस्थितीत विविध गोंवीद पथकांनी दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला.याप्रसंगी मंचकावर रंगारंग कार्यक्रम सुध्दा आयोजित करण्यात आला होता.पावसाच्या व नगरपालिकेच्या टँकरमधून बरसणा-या पावसात हजारो प्रेक्षकांनीही मनसोक्त डी.जे.वर ताल धरून मनसोक्त आनंद लुटला.शहरात प्रथमच होत असलेल्या दहीहंडीला नागरिकांनी सुध्दा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच स्थानीक *ओल्ड ईज गोल्ड क्रिकेट क्लब ने उपस्थीत प्रेक्षकांना व स्पर्धकांना पोहे वाटप केले* यामध्ये प्रामुख्याने दिलीप टेंभरे,शंभू कडू,सिध्दू इंगळे,अनिल दलाल,जगेश मिरगे,निळकंठ दलाल,डाँ.अमर मते,डाँ.जाधव,निलेश मते,प्रमोद नैकेले,गजानन पारधी व सर्व सदस्यांनी उपस्थितीतांना व गोवींदा पथकांना पोहे वाटप केले.विजेत्यांना बक्षीस विजय पिंपळकर,अजय लकडे,डाँ.राईकवार,अत्ताशहा व प्रवीण हेडावू यांचे तर्फे देवून सन्मानित करण्यात आले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.