BREAKING NEWS

Sunday, September 4, 2016

*अचलपूर गांधी पूल परिसरातील बि.एस.एन.एल.ची सेवा ठप्प*

प्रमोद नैकेले /-
*अचलपूर*:-
 

अचलपूर गांधी पूल परिसरातील भारत दुर संचार अर्थात बि.एस.एन.एल.ची सेवा गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे त्यामुळे अनेक आँनलाईन सेवा ठप्प झाल्या आहेत.
अचलपूर मध्ये ऐकावे ते नवलच आहे गेल्या काही दिवसांपासून शहरातील गांधी पूल परिसरातील बि.एस.एन.एल.ची दूरध्वनी सेवा बंद आहे त्यामुळे ग्राहकांना अनेक आठवणींना तोंड द्यावे लागत आहे.सेवा बंद असण्याबाबत तक्रार केली असता टेलिफोन केबल चोरी गेल्याचे समजले.अशा घटना आजपर्यंत अनेक वेळा यापरीसरात घडल्या मात्र दुर संचार निगमने या वर कायमस्वरूपी काहीच ऊपाय केलेला नाही तसेच ह्या घटना ज्या परिसरात होत आहेत तेथेच पोलीस स्टेशन आहे रात्रीची गस्त व गांधी पूल चौकातील हायपर माँक्स च्या लख्खं प्रकाशात अशा घटना होत आहे हे विशेष महत्त्वाचे आजपर्यंत झालेल्या चोरीच्या घटनांचा शोध सुध्दा लागला किंवा नाही पण ग्राहकांना मात्र विनाकारण त्रास व भुर्दंड सोसावा लागतो याकडे भारत संचार निगम व पोलीस प्रशासनाने या कडे लक्ष देऊन होणा-या घटना व ग्राहकांची गैरसोय त्वरित बंद व्हावी अशी जनतेची मागणी आहे.
 ................

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.