मुंबई - विविध वृत्तपत्रांत शासनाच्या विविध योजना, धोरणे, कार्यक्रम,
प्रशासन कार्यपद्धती, यंत्रणा अधिकारी, कर्मचारी यांच्याविषयी बाबतच्या
बातम्या प्रसिद्ध होतात. त्यामध्ये टीकात्मक विश्लेषण केलेले असते.
अशाप्रकरणी शासनाची वस्तुनिष्ठ भूमिका जनतेपुढे येणे अत्यावश्यक आहे.
याबाबत मंत्री आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचारी यांच्या मदतीने माहिती व
जनंसपर्क विभागाने त्याच दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत संबधित वृत्ताचा
खुलासा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाने दिले. आज मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी मंत्रालयात मंत्री
आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचारी तसेच माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी
यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात
येते.
सरकारचे धोरण, घेतलेले निर्णय, केलेले काम याचे माध्यमात विरोधी वृत्त आले अथवा वस्तुस्थितीचा विपर्यास झाले असेल, तर त्याबाबत खुलासा पाठवण्यात यावा, अशा आशयाचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केला होता. या कार्यवाहीची पद्धतदेखील सांगितली आहे. मात्र, याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयाच्या निदर्शनास आले होते. याबाबत ही बैठक घेण्यात आली होती. मंत्री आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचारी यांनी माहिती व जनंसपर्क अधिकारी यांच्यात दुवा म्हणून काम करण्याचे निर्देश ही या वेळी देण्यात आले आहेत.

Post a Comment