कोल्हापूर - भारतीय संस्कृतीत महिलेला पुष्कळ महत्त्व देण्यात आले
आहे. आज आपण पृथ्वीला पृथ्वीमाता-जननीमाता-भूमाता, तर गायीला गोमाता,
देशाला भारतमाता, असे म्हणतो; मात्र आजच्या आधुनिक युगात आपल्याला भारतीय
संस्कृतीचा विसर पडत आहे. आज पाश्चात्त्य पद्धतीचे विविध डे साजरे
केल्यामुळे भारतीय संस्कृतीची हानी होत आहे. त्यासाठी समाजात विशेषकरून
मुलांवर योग्य संस्कार होण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे, असे
मार्गदर्शन सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी
केले. त्या यमगर्णी येथे धर्मस्थळ संघाच्या मेळाव्यात बोलत होत्या. हा
मेळावा २८ ऑगस्ट या दिवशी पार पडला.
Post a Comment