अचलपूर/प्रमोद नैकेले/---
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसेनानी व क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले हे स्वातंत्र्य अबाधीत राहावे म्हणून आजही शेकडो जवान दिवसरात्र सीमेवर डोळ्यात तेल घालून तैणात आहेत.
स्वातंत्र्य मिळून आज सत्तर वर्षे झालीत तरीही आपला देश सुरक्षित नाही.शेजारी राष्ट्र पाकिस्तान व तेथील आतंकवादी नेहमीच सीमारेषा ओलांडून आपल्या देशात घुसखोरी करून भ्याड हल्ला करीत असतात.अशा घुसखोरी आतंकवाद्यापासून देशाचे रक्षण करण्यासाठी आपले जवान आपल्या जिवाची पर्वा न करता तैणात असतात व वेळप्रसंगी शहीद सुध्दा होतात,अशाच एका आतंकवादी हल्यात नुकतेच विस जवान शहीद झाले त्यामध्ये महाराष्ट्राचे चार जवानांचा समावेश आहे.नुकतेच जम्मू काश्मीर मधील ऊरी येथे झालेल्या आतंकवादी हल्लात भारतीय सेनेचे विस सैनिक शहीद झाले त्यामध्ये महाराष्ट्राचे चार जवान असून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील विकास ऊर्फ पंजाब जानराव ऊइके याचा सुध्दा समावेश आहे. त्याचेवर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या या बलिदानाने संपूर्ण देशात शोककळा पसरली याअनुशंघाने स्थानीक गांधी पूल येथे ओल्ड इज गोल्ड क्रिकेट क्लब व गांधी पूल रहिवासी यांचे तर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली याप्रसंगी दिलीप टेंभरे,गजानन पारधी,निळकंठ दलाल,जगेश मीरगे,अनिल दलाल,नंदकीशोर काळे,अमोल दलाल,निळकंठ पाटील,गजानन शर्मा,प्रमोद नैकेले,शंभू कडू,व समस्त सदस्य नागरिकांना प्रामुख्याने उपस्थीत होते.
Post a Comment