अमरावती /सुरज देवहाते /-
आतापर्यंत शांततेत पार पडणार्या या मूक मोर्चाला अमरावतीत वाढता पाठिंबा लक्षात घेता जिल्ह्यात १0 लाखांच्यावर मराठा समाज या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत झालेल्या मोर्चाची यशस्वीता लक्षात घेता जिल्ह्यात तरुणाईचा वाढता पाठिंबा व संयुक्तीक नेतृत्वाची एकजूट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. राजकमल चौक येथील नेहरू मेदान येथे इतक्या मोठय़ा प्रमाणात मोर्चेकरी एकवटणार असल्यामुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ होणार हे मात्र नक्कीच.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे व अहमदनगर
जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करुन तिची हत्या
केल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चाचे आयोजन व इतर मागण्याकरीता सकल मराठा
समाज
बांधव अमरावती जिल्हा तर्फे आज दि.२२ सप्टेंबर, २०१६ रोजी मराठा क्रांती
मूक
मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्च्यासाठी अमरावती जिल्ह्यातून मोठ्या
प्रमाणात वाहनासह नागरिक नेहरु मैदान येथे एकत्रित होवून नेहरु मैदान येथून
मूक मोर्चाची सुरुवात करणार आहे. मोर्चा हा नेहरु मैदान, राजकमल चौक- शाम
चौक- जयस्तंभ चौक- मालविय चौक- मर्च्युरी टी पॉईंट- इर्विन चौक-गर्ल्स
हायस्कुल चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे.
सदैव बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणारा मराठा समाज
आज मागे पडला आहे. अशा मराठा समाजाच्या उन्नतीसाठी, समाजातील महिलांच्या
सुरक्षिततेसाठी आणि आरक्षणासारख्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी
‘भव्य मराठा क्रांती मूक मोर्चा’ आज अमरावती येथून निघणार आहे

Post a Comment