नाशिक /--
नाशिक येथे बन्जारा समाजाच्या एका ५ वर्षीय मुलीवर एका इसमानाने अमानुष बलात्कार केला. त्या घटनेचा निषेध म्हणून संघटनेने आज २२ सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्याचे ठरवले आहे . यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कोपर्डीच्या घटनेच्या विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. त्यामध्ये ऍट्रॉसिटी कायदा रद्द कारण्याची मागणी केली जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठीही हा समाज सरकारवर दबाव आणत आहे.
बंजारा संघटनेचा निघणारा मोर्चा हा कोण्या समाजाच्या विरोधातील नसू तो पीडित समाजाला न्याय देण्यासाठी सरकारला जागे करणारा असणार आहे असेही ते म्हणाले. मात्र सध्या काही ठिकाणी निघत असलेले मोर्चे चुकीची मागणी करीत असून त्यामुळे राज्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते एक मराठा लाख मराठा म्हणत असतील तर आमच्याकडेही एक बंजारा ५ लाख बंजारा अशी ताकद आहे. त्यामुळं कोणी कोणाला चिथावण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहनही राठोड यांनी केले. आजचा २२ सप्टेंबर रोजीच्या नासिक येथील मोर्चानंतर लवकरच मुंबईतही भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली. ठाण्यातील शासकीय विश्राम गृहात झालेल्या या पत्रकार परिषदेत हरिभाऊ राठोड यांच्यासह छाया राठोड, ओमकार जाधव, रामदास राठोड, लक्ष्मण मदार, सुभाष तंवर एकनाथ नाईक आदिमान्यवर उपस्थित होते.

Post a Comment