ज्येष्ठा गौरींचे आगमन- गौरी आणि १६ अंकाचं महत्त्व
Posted by
vidarbha
on
8:00:00 PM
in
|
|
अमरावती /-- श्री गणरायाच्या आगमना नंतर आज ज्येष्ठा गौरींचे(महालक्ष्मी) भक्तिमय वातावरणात आगमन झाले. ज्येष्ठा गौरींचे उद्या (ता. 9) पूजन होईल. ज्येष्ठा गौरीच्या स्वागतासाठी सकाळपासून भाविकांची धावपळ सुरू होती. प्रत्येक जण आपापल्या कुलाचाराप्रमाणे ज्येष्ठा गौरींची प्रतिष्ठापना करतो. भाद्रपद शुद्ध पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींचे पूजन होते. त्यामुळे त्यांना ज्येष्ठा गौरी म्हणतात. काही भाविकांकडे उभ्या गौरी, झोपाळ्यावर, तर अनेक जण मोठ्या टेबलावर गौरीची स्थापना करतात. परंपरेनुसार काहीजण नदीपात्रातून पाच किंवा सात खडे आणून त्याचे पूजन करतात. घरोघरी गौरीच्या भोवती सुंदर आराससह रोषणाई केली आहे. गौरींचे उद्या पूजन होईल, त्यानंतर सायंकाळी महिलांसाठी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासह रात्री जागरण होईल. तिसऱ्या दिवशी (ता. 10) गौरींचे विसर्जन होईल. ज्येष्ठा गौरीसाठी बाहेरगावी असणारे भाऊबंदकीची मंडळी आज एकत्र आले होते.
गौरी आणि १६ अंकाचं महत्त्व
गौरीच्या सणात सोळा अंकाचं महत्व खूप आहे . सोळा प्रकारच्या भाज्या यावेळी केल्या जातात . यामागिल कारण चंद्राच्या सोळा कला असतात . असं सांगितलं जाते की त्या सोळा कला म्हणजे शंखिनि , पद्मिनी , लक्ष्मी , कामिनी , व्यपिनी , ऐश्वर्यवर्धिनी , मोंदा , आश्चर्यदा , आल्हादिनी , व्यापिनी , मोहिनी , प्रभापदा , क्षीरवर्धिनी , वेगवर्धिनी , विकासिनी , सौमिनी अशा आहेत . यामुळे सोळा प्रकारची पक्वान्न व पुजेला सोळा प्रकारची पत्री लागतात . गौरीचं आवाहन केल्यावर ती सोळा कलांसह येते . असं मानलं जातं . २७ नक्षत्रापैकी १६ नक्षत्र पूर्ण झाल्यावर १७ व नक्षत्रं अनुराधा येतं . यावेळी शेतात पिक भरभरून आलेलं असते . भाज्यांची रेलचेल असते . या धान्यलक्ष्मीचे प्रतिक म्हणुन घरी लक्ष्मीला आवाहन केले जाते . त्यामुळे अनुराधा नक्षत्रावर गौरीना म्हणजेच महालक्ष्याना आणलं जातं .
|
Post a Comment