:- उस्मानाबाद लाइव्हचे संपादक आणि दैनिक गावकरीचे प्रतिनिधी सुनील ढेपे यांच्यावर उस्मानाबाद येथील एका मटका किंगने हल्ला केला आहे.
गावकरीच्या कार्यालयात जाऊन केलेल्या या हल्ल्यात गावकरीच्या कार्यालयाचीही मोट्या प्रमाणात मोडतोड झाल्याचे वृत्त समजले .
या हल्ल्यात ढेपे यांना चांगलीच दुखापत झाली आहे. उस्मानाबादच्या पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
पोलिसांनी सुनील ढेपेंचा जबाब नोंदविण्यात आलेला असुन त्या वेळी पोलिसानी ढेपेंचा मोबाईल बंद केल्याचे समजते त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही .
दिनांक 4 सप्टेंबरच्या गावकरीमध्ये ढेपे यांनी बातमी दिली होती.त्याचा राग मनात धरून हा हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे.
आनंदनगर भागात राजरोस मटका सुरू असताना पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत अशी बातमी ढेपे यांनी दिलेली होती.त्याच रागातून हे सारे प्रकरण घडले असल्याचे असे सर्वच बोलत असुन या हल्ल्य्याचा हल्लेखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे हि मागणी पञकार संरक्षण समिती व महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपञ पञकार असोसिएशन यांनी केली असुन *महाराष्ट्रात गणपती बाप्पाचे सर्वीकडेच आगमन झाले आहे , मा. मुख्यमंत्री साहेबांना गणपती बाप्पा सदबुध्दी देओ व हल्लेखोरांना ताबडतोब अटक करून पञकार संरक्षण कायदा अस्तित्वात आणो हिच बाप्पा कडे प्रार्थना अशी आशा हि त्यांचा कडून करण्यात आली आहे
Thursday, September 8, 2016
*पत्रकार सुनील ढेपे यांच्यावर झालेल्या हल्ला संदर्भात पञकार संरक्षण समिती घेणार उस्मानाबादचे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांची भेट*
Posted by vidarbha on 7:38:00 PM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment