प्रमोद नैकेले /--
अचलपूर:-
अचलपूर:-
आरोग्य विभाग महाराष्ट्र तर्फे राज्यामध्ये जंत मुक्त व्हा मुलांना सशक्त बनवा अभियाना अंतर्गत 14 सप्टेंबर रोजी सकाळी शाळेत शिकत असलेल्या 1 ते 19 वयोगटातील मुलामुलींना जंत विरोधक गोळ्यांचे वितरण करण्यात आले.जंतामुळे कुपोषण होवून रक्तक्षय होतो व वाढ खुंटते.म्हणुन 1 ते 19 वयोगटातील मुलामुलींना जंत विरोधक गोळ्यांचे वाटप करण्याचा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचा संकल्प 14 सप्टेंबर रोजी पार पडला.याप्रसंगी स्थानीक राष्ट्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक पि.एन. सुरपाटने यांनी वर्ग पाच ते सात च्या विद्यार्थ्यांना या गोळ्या स्वता खाउ घालून हा उपक्रम यशस्वी पणे पुर्ण केला.तसेच ममता तीवारी विज्ञान शिक्षिका यांनी वर्ग आठ ते दहा च्या विद्यार्थ्यांना गोळ्यांचे वाटप केले.याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक प्रमोद नैकेले,पर्यवेक्षक सुनिल झंवर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.
Post a Comment