रंगय्या रेपाकवार/ अहेरी /----
★तब्बल ३ तास चर्चा
★सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित
★सर्वच विभागाला एसडीओचे दिशानिर्देश

दोन दिवसा आधी वेलगुर, वेलगुरटोला,किष्टापुर,बोटलाचेरू सह जवळपासच्या गावातील हजारो नागरिकांनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी रास्तारोको आंदोलन केले होते त्यावेळी अहेरी चे उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ति यांनी त्यावेळी १६ तारखेला अहेरी उपविभागीय कार्यालयात बैठक घेऊन समस्या सोडविन्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे आज सामाजिक कार्यकर्ते बबलु हकिम यांच्या नेतृत्वात वेलगुर सह ईतर गावांच्या नागरिकांची अहेरी उपविभागीय कार्यालयात एस. राममूर्ति यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या वेळी प्रत्येक विभगाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी वेलगुर-बोटलाचेरू हा रस्ता जिल्हा परिषद मधे मंजूर झाला असून सध्या दुरुस्तीही सुरु झाली असून पावसाळ्या नंतर या रस्त्याचे डांबरिकरन होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद उपविभागीय अभियंता मडावी यांनी दिली. वेलगुर च्या विज समस्येसाठी २२० केव्ही चे नविन ट्रांसफार्मर साठी प्रस्ताव तयार केला असून या साठी ५ लक्ष चे इस्टीमेट तयार झाले व वेलगुर परिसरातील नागरीकांना विदुयत बिल भरण्यासाठी दर बुधवारी वेलगुरला दोन कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे अधिकारी यांनी दिली. ३ पिढ्यांच्या पुरावा अटीमुळे जमिनीचे पट्टे वाटपास अड़चण होत असून प्रलंबित दावे व प्रकरण सादर करण्याचे निर्देश एस.राममूर्ति यांनी दिले. वेलगुर प्राथमिक आरोग्य केंद्र ते शंकरपुर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ही लगेच सुरु करावे व ६००मीटर रस्त्याचे जिल्हा परिषद ने बांधकाम करावे या साठी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पत्र देण्यात आले. वेलगुर येथे 3जी सेवा सुरु करण्यात यावी यासाठी आलापल्ली ते वेलगुर पर्यंत भूमिगत फायबर ऑप्टिक केबल टाकन्यासाठी प्लान तयार करून सादर करावे व खोदकामासंबंधी नाहरकत साठी वनविभागास पाठपुरावा करावा असे पत्र डिस्ट्रिक्ट टेलीकम्युनिकेशन ऑफिसर यांना पत्र देण्यात आले. तेंदु बोनस वाटप विषयात वनविभागाकडून जिल्हा परिषद ला निधी पाठविण्यात आला असून येत्या काही दिवसात संबंधित ग्राम पंचयतिला हा निधी प्राप्त होणार असल्याची माहिती देण्यात आली. एमआरईजीएस अंतर्गत पांदन रस्त्याची मजूरी वाटप करण्यात आली असून मटेरियल बिल बाकी असल्याची माहिती संवर्ग विकास अधिकारी सुनील तडस यांनी दिली. तसेच घरकुल योजनेचे हप्ते त्वरित वाटप करावे अन्यथा कड़क कार्यवाई चे निर्देश एस.राममूर्ति यांनी दिले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळे संबंधी नविन प्रस्ताव जिल्हा परिषद ला पाठविण्यात आल्याची माहिती बीईओ वैद्य यांनी दिली. प्रत्येक वर्षी शालांचे सर्वेक्षण करावे असे आदेश एस.राममूर्ति यांनी दिले. तात्काळ वेलगुर येथे पशुवैद्यकीय कर्मचारी ची नियुक्ति करावी व इमारती संबंधी प्रस्ताव सादर करावा व आपल्या वरिष्ठांना पाठवावे असे निर्देशही राममूर्ति यांनी दिले. रस्त्याच्या दुरुस्ती नंतर सर्व १९ एसटी बस फेऱ्या वेलगुर-बोटलाचेरू मार्गे नेण्यात येणार असल्याची माहिती अहेरी एसटी आगार प्रमुख फाल्गुन राखड़े यांनी दिली.
तसेच ईतर मुख्य विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. नायब तहसीलदार सत्यनारायण सीलमवार,वनिता नेरलवार, सदस्य आत्माराम गद्देकार, राजेश उत्तरवार,वेलगुर च्या सरपंच कुसुम दूधी,किष्टापुरच्या सरपंच अंजना पेंदाम,उपसरपंच शंभु झोड़े,जि प सदस्य विजया विठलानी,पुष्पा अलोणे, ग्रा प सदस्य आदिल पठाण,अरविन्द खोब्रागडे, देवाजी मडावी,विनायक बोरुले,अब्दुल हुसेन शेख,सह ईतर नागरीक उपस्थित होते.
Post a Comment