प्रचंड उत्साह, मराठा समाजाची उत्सुकता शिगेला
पाच लाख लोकांची उपस्थिती राहण्याची शक्यता
शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त
शहरात ठिकठिकाणी लागले ध्वनीप्रक्षेपक
अमरावती - सुरज देवहाते /---
मराठा समाजाला आरक्षण मिळावे व अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करुन तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चाचे आयोजन व इतर मागण्याकरीता सकल मराठा समाज
बांधव अमरावती जिल्हा तर्फे उद्या दि.२२ सप्टेंबर, २०१६ रोजी मराठा क्रांती मूक
मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्च्यासाठी अमरावती जिल्ह्यातून मोठ्या
प्रमाणात वाहनासह नागरिक नेहरु मैदान येथे एकत्रित होवून नेहरु मैदान येथून
मूक मोर्चाची सुरुवात करणार आहे. मोर्चा हा नेहरु मैदान, राजकमल चौक- शाम
चौक- जयस्तंभ चौक- मालविय चौक- मर्च्युरी टी पॉईंट- इर्विन चौक-गर्ल्स
हायस्कुल चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे.
सदैव बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणारा मराठा समाज
आज मागे पडला आहे. अशा मराठा समाजाच्या उन्नतीसाठी, समाजातील महिलांच्या
सुरक्षिततेसाठी आणि आरक्षणासारख्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी
‘भव्य मराठा क्रांती मूक मोर्चा’उद्याअमरावती येथून निघणार आहे
मराठा क्रांती मूक मोर्चाच्या अनुषंगाने गुरुवार २२ सप्टेंबर रोजी संपूर्ण
दिवसभर शहरबसेस बंद ठेवण्यात येणार आहेत. नेहरु मैदान ते जिल्हाधिकारी
कार्यालयापर्यंत मराठा क्रांती मूकमोर्चा काढण्यात येणार असल्याने शहरबस
बंद राहतील. याची नागरिक, प्रवासी आणि विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे आवाहन
महापालिकेचे उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी केले आहे.
उद्याचा मोर्चा संदर्भात शहरात ठिकठिकाणी ध्वनिप्रक्षेपक लावण्यात आले आहेत
मराठा आरक्षण हा मुद्दा येथे कुठुण उपस्थित झाला, हा मुक मोर्चा कोपर्डी प्रकरनाचा निशेध मोर्चा आहे. ज्या मराठ्यान्ना आरक्षन पाहिजे त्यान्नी नंतर एकत्र येउन मोर्चे काढावेत. या मोर्चा मधे कोनिही आपले राजकारन खेलू नये हि विनंती.
ReplyDeleteअनिल सु.टेकाडे.
अमरावती
9326047976
मराठा आरक्षण हा मुद्दा येथे कुठुण उपस्थित झाला, हा मुक मोर्चा कोपर्डी प्रकरनाचा निशेध मोर्चा आहे. ज्या मराठ्यान्ना आरक्षन पाहिजे त्यान्नी नंतर एकत्र येउन मोर्चे काढावेत. या मोर्चा मधे कोनिही आपले राजकारन खेलू नये हि विनंती.
ReplyDeleteअनिल सु.टेकाडे.
अमरावती
9326047976
virod naka daku ho sir aatach
ReplyDelete