BREAKING NEWS

Wednesday, September 21, 2016

बंजारा समाजातील चिमुकलीवर अन्याय -अत्याचार -आणि बलात्कार झाल्याचा निषेधार्त उद्या नाशिक येथे "आक्रोश मोर्चा"

नाशिक /विशेष प्रतिनिधी /--

 
 नाशिक येथे बन्जारा समाजाच्या एका ५ वर्षीय मुलीवर एका  इसमानाने अमानुष बलात्कार केला. त्या घटनेचा निषेध म्हणून संघटनेने उद्या २२ सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्याचे ठरवले आहे . यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कोपर्डीच्या घटनेच्या विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. त्यामध्ये ऍट्रॉसिटी कायदा रद्द कारण्याची मागणी केली जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठीही हा समाज सरकारवर दबाव आणत आहे.
बंजारा संघटनेचा निघणारा मोर्चा हा कोण्या समाजाच्या विरोधातील नसू तो पीडित समाजाला न्याय देण्यासाठी सरकारला जागे करणारा असणार आहे असेही ते म्हणाले. मात्र सध्या काही ठिकाणी निघत असलेले मोर्चे चुकीची मागणी करीत असून त्यामुळे राज्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते एक मराठा लाख मराठा म्हणत असतील तर आमच्याकडेही एक बंजारा ५ लाख बंजारा अशी ताकद आहे. त्यामुळं कोणी कोणाला चिथावण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहनही राठोड यांनी केले. २२ सप्टेंबर रोजीच्या नासिक येथील मोर्चानंतर लवकरच मुंबईतही भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली. ठाण्यातील शासकीय विश्राम गृहात झालेल्या या पत्रकार परिषदेत हरिभाऊ राठोड यांच्यासह छाया राठोड, ओमकार जाधव, रामदास राठोड, लक्ष्मण मदार, सुभाष तंवर एकनाथ नाईक आदिमान्यवर उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.