भंडारा / अजय मेश्राम /---
पाकिस्तान ने पोसलेल्या जैश- ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या चार
दहशतवाद्यांनी रविवारी काश्मीर मधील उर्रीतील लष्करात भीषण हल्ला केला़
या हल्ल्यात संदीप सोमनाथ ठोक, चंद्रकांत शंकर गलाडे, विकास जनार्दन
कुळमेथे विकास जानराव उईके सारखे जवान शहीद झाले़ याचे पडसाद संपूर्ण
देशात उमळले असून याचा तीव्र निषेध भंडारा शहरात शिवसेने तर्पेâ करण्यात
आले आहे़
काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर रविवारी करण्यात
आलेल्या अतिरेक्यांच्या निषेधार्त संपूर्ण देशातून पाकिस्तान विषयी विरोध
प्रकट होत असून आज २० सप्टेंबर च्या सायंकाळ चा सुमारास भंडारा येथे
सुद्धा शिव सेनेचा वतीने पाकिस्तान विरुद्ध घोषणाबाजी करीत पाकिस्तान चा
झेंडा जाळण्यात आला़ ़शहरातील मुख्य गांधी चौकात मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक
एकत्रित येत या घटनेचा निषेध व्यक्त करीत पाकिस्तान विषयी घोषणाबाजी करीत
शेवटी झेंडा फाडण्यात सुद्धा आला़ यावेळी मोठ्या संख्येत शिवसेनेचे
पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते़ पाकिस्ताच्या पाकिस्तान ने
पाळलेल्या जैश- ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांनी
रविवारी काश्मीर मधील उर्रीतील लष्करात भीषण हल्ला केला़ या हल्ल्यात
भारतीय सैनिक शहीद झाले़ याचा प्रत्युत्तर म्हणुन भारत सरकारने ठोस पाऊल
उचलण्यात यावे असे पडसाद सर्वत्र उमडत आहेत़
प्रत्यक्ष नियंत्रण
रेषा ओळांडून थेट लष्करी तळालाच लक्ष्य करण्याच्या पाकपुरस्कृत
दहशतवाद्यांच्या कृत्यामुळे देशभरात संतापाची लाच उसळलेली असतांनाच भारतीय
लष्करानेही आता अशा प्रकारच्या हल्ल्या विरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज
आहे़ सीमेपलीकडून होणाNया कोणत्याही आगळिकीला तेवढ्याच ताकदीने उत्तर
देण्याची क्षमता भारतीय लष्करात असून योग्य वेळ येताय या क्षमतेचा आम्ही
पुरेपर वापर करुन हल्याच्या सूत्रधारांना चोख प्रत्युत्तर देवू असे लष्करी
कारवायांचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी ठणकावले, दरम्यान उरी
हल्यामागील पाकचा चेहरा जगासमोर आणून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर
एकटे पाडण्याच्या हालचाली वेंâद्राच्या पातळीवर सुरु झाल्या आहेत़
तसेच
दहशतवाद्यांनी केलेल्या लष्करी हल्याचे निषेध आता संपूर्ण देशात होत आहे़
तसेत सत्ताधारी सरकारने या हल्ल्याचा प्रतित्युर म्हणुन भारतीय सैनिकांना
पाकिस्तान चा नायनाट करावा असे आदेश देण्यात यावे सर्वदलीय संघटनांकडून
होत आहे़ त्याच अनुशंगाने आज भंडारा शहर येथील गांधी चौकात शिवसेनेच्या
कार्यकर्ता-पदाधिकाNयांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून पाकिस्तान विरोधी घोषणा
केल्या़ यावेळी शिवसेनेचे संजय रेहपाडे, अनिल गायधने, ललित बोंद्रे,सतिश
तुरकर, नितीन साकुरे, मुकेश थोटे, पंकज दहिकर, मयुर लांजेवार, संदीप
सार्वे, मयुर जोशी, जग्गु हजारे, मुकेश राऊत, प्रविण कळंबे, भगवान बाभरे,
नितेश मोगरे, प्रणय बांते, विनोद पडोळे, अशोक चौधरी, गोलु नेवारे इत्यादी
असंख्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते़
Post a Comment