BREAKING NEWS

Wednesday, September 21, 2016

मुख्यालयी न राहता घरभाड्याचि उचल करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कार्यवाही करा.

अजय मेश्राम /भंडारा /--


नगर विकास संघर्ष समिती मोहाडी गावकरी ना घेऊन करणार जनआंदोलन
  मोहाडी शहरात मुख्यालयी कार्यालयात नगर पंचायत चे अधिकारी,पोलीस,डॉक्टर,कुरुशी सेवक,शिक्षक,ढोर डॉक्टर,पाटबंधारे,वनविभाग,येथिल अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसून शासनकडून घरभाडे व भत्ता उचलून घेतात असे स्पष्ट चित्र मोहाडी मधे दिसून येत आहे .नागरिकांमधे चर्चेला मात्र मोठ्या प्रमाणात उधाण आलेली आहे .                             
               वेडेवर कोणत्याच प्रकार च्या योजनांची माहिती होत नाही .वेडेवर प्रमाणपत्र मिडत नाही .सामान्य नागरिकांना कार्यालय पर्यत पोह्चुण कर्मचारी हजर नसल्याने अनेकदा कार्यालयाचा चक्रा घालाव्या लागतात .त्रास सहन करावा लागतो .अनेक लाभर्थि योजना पासून वंचित असल्याचे दिसून येत आहे .मोहाडी गावचा विकासात खोड्म्बा असलेले अधिकारी व कर्मचारी प्रवासात  व येण्याजाण्यात वेड निघून जाते फक्त काही अल्प वेडे साठी कर्मचारी कार्यालयात हजेरी लावत असतात . फक्त वेतन.पगार,भत्ता.घर भाडे घेण्यासाठी कर्मचारी असतील तर नागरीकांच्या सेवेसाठी नसतील तर नगर विकास संघर्ष समिती मोहाडी हे खपवून घेणार नाही अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून अधिकारी ला आपल्या स्टाइल ने वठणीवर आणावे लागेल .                                       लाभार्थी योजने पासून वंचित आहेत शासकीय योजने साठी लागणारे प्रमाणपत्र वेडेवर मिडत नाही .शिक्षक  जिल्हा परिषद साडेत विद्यार्थ्याला शिकवतात पण त्याची मुले मात्र कान्वेंट मधे शिकतात .म्हणून जी .प .साडेची पटसंख्या कमी होत आहे .अनेक जानवर रोग होऊन दगावतील पण शासकीय ढोर डॉक्टर वेडेवर पोहचत नाही .     शासकीय विभागात कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी यानी मुख्यालयी रहावे नागरिकांची प्रामाणिक पणे सेवा करावी .जनतेचा अपेक्षा भंग करू नये .टाडाटाड करू नये .खऱ्या गरजूना लाभ द्यावा व नागरीकांच्या समस्या जाणून घ्या गरीब जनतेला त्रास देऊ नका अन्यथा नगर विकास संघर्ष समिती मोहाडी नागरिकांना सोबत घेऊन आपल्या स्टाइल ने प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन त्यांचे स्वागत पुष्पहारने करून अनोखा जनआंदोलन करण्याचा इशारा नगर विकास संघर्ष समिती  मोहाडी चे खुशाल कोसरे,रफिक बबलू सैय्यद,विजय गायधने,पूर्शोत्त्म पात्रे.राजू बावने,अरविंद नंदनवार.सुहास लंजेवार,चोपकर गुरुजी,अर्जून मरसकोल्हे व नागरिकांनी दिला आहे .या कडे सम्पूर्ण मोहाडी वासियांचे लक्ष लागले आहे हे विशेष .

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.