BREAKING NEWS

Monday, September 5, 2016

खरे आरोपी सोडून हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लक्ष्य करणे, हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र ! - संजय राऊत, खासदार, शिवसेना

 
संजय राऊत
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आणि देशात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्याचे कारस्थान चालू आहे. एकवेळ पाकिस्तानातून लष्कर-ए-तोयबा सारख्या संघटनांनी उघडपणे आक्रमण केले, तर ते समजण्यासारखे आहे; पण आमच्याच हिंदुस्थानात एखाद्या विशिष्ट समाजाला बरे वाटावे यासाठी, तसेच स्वत: निधर्मी वा धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखवण्यासाठी हिंदूंना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे अन् त्यांच्या कार्यकर्त्यांना आतंकवादी ठरवणे, असे प्रकार चालू आहेत. हे हिंदु धर्माच्या अन् देशाच्या मूळावर उठणारे आहे. सनातन संस्थेविषयी काही आक्षेप असतील, तर ते कायद्याच्या चौकटीत राहून त्याची चौकशी होऊ शकते. त्याच्यामध्ये खरोखर काही वेडेवाकडे करणारे लोक दुर्दैवाने आढळले असतील, तर तपासतकार्यात देखील ते सहकार्य करू शकतील किंवा गुन्हेगार म्हणून त्यांच्यावर कारवाई होऊ शकेल. तथापि काही नसतांना अशाप्रकारे संघटना संपवायची, कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करायचे आणि निरपराध्यांना फासावर लटकवायचे, हे कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह यांच्या प्रकरणातदेखील सिद्ध झाले आहे. त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध झालेला नसतांना त्यांना अनेक वर्षे कारागृहात ठेवले आणि त्यांच्यावर अत्याचार केले. आता सनातनच्या संदर्भातही तेच चालू आहे. गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी देखील निषेध केला आहे. अशा प्रकारे हत्या ही मानवतेला कलंक आहे; परंतु खरे आरोपी सोडून हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लक्ष्य करणे यामागे फार मोठे राजकीय षड्यंत्र आहे. हे षड्यंत्र हिंदुत्व आणि हिंदुस्थान संपवण्याचे आहे. कोल्हापुरातील घटनांकडे या देशातील सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी गांभीर्याने पहायला हवे, नाहीतर या देशाचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.