प्रत्येक जिवंत समाजाने बदलासाठी सिद्ध असले पाहिजे. धर्माच्या नावाने
दिले जाणारे बळी धर्माला तरी अनुसरून आहे का ? याचा विचार करून काळानुसार
त्यात पालट व्हायला हवेत. मांढरदेवीची यात्रा असेल किंवा गणेशोत्सव असेल,
यात हिंदु समाजाने पालट स्वीकारले. दहिहंडीसारख्या हिंदूंच्या सण आणि उत्सव
यांबाबत जेव्हा सांगण्यात येते तेव्हाही कुणी कांगावा करत नाही. बकरी
ईदच्या दिवशी आज साधारण ८० लाखांपेक्षा अधिक जनावरे कापली जातात. हा आकडा
इतका अवाढव्य आहे. धर्माच्या नावाखाली एका दिवसांत एवढी जनावरे कापली जात
असतील, तर त्याचा पर्यावरणाशी संबंध आहे. तो नाकारता कसा येईल ?
Post a Comment