वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीद्वारे
आयोजित हिंदु धर्मजागृती सभेत हिंदूंची प्रतिज्ञा !
वाराणसी - येथील रामलीला मैदानमध्ये २५ सप्टेंबर या दिवशी
हिंदु जनजागृती समितीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्म जागृती सभेत
हिंदु राष्ट्र आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे तो आम्ही मिळवणारच, अशी सामूहिक
प्रार्थना करण्यात आली. या वेळी अखिल भारतीय धर्म संघाचे महामंत्री श्री.
जगजीतन पाण्डेय, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी, सनातन
संस्थेचे श्री. गुरुराज प्रभु, रणरागिणी शाखेच्या सौ. प्राची जुवेकर आणि
हिंदु जनजागृती समितीचे श्री. निलेश सिंगबाळ यांनी मार्गदर्शन केले. या
सभेला ५५० धर्माभिमानी उपस्थित होते.
Post a Comment