मराठा क्रांती मूक मोर्चा -यवतमाळ -वाशीम झाले मराठ्यांचा मूक मोर्चाने भगवामय
Posted by
vidarbha
on
3:43:00 PM
in
|
यवतमाळ /--
या मोर्चामध्ये कोपर्डी बलात्कार आणि
हत्या प्रकरणातील नराधमांना तात्काळ फाशी देण्यात यावी, ऍट्रॉसिटी कायदा मध्ये बदल करावा आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशा मागण्या या
मोर्चादरम्यान करण्यात येत आहेत.
विदर्भातील यवतमाळ व वाशीम शहरांमध्येही आज सकल मराठा समाज
लाखोंच्या संख्येने एकत्र आला . यवतमाळच्या पोस्टल ग्राऊंडवरून
मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चाला सुरूवात झाली आहे. हाती भगवे ध्वज घेऊन
अबालवृद्ध अत्यंत शिस्त आणि शांततेत या मोर्चात सहभागी झाले आहेत. काळे
कपडे परिधान करून विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन तरुणाई कोपर्डीच्या
घटनेचा निषेध करत आहे. एक मराठा लाख मराठा, असे लिहीलेल्या टोप्या घालून
समाजबांधव या मोर्चात सहभागी आहेत.यवतमाळ येथे पावसाने यावेळी हजेरी लावली तरीही मराठ्यांचा उत्साह कमी झाला नाही
जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चासाठी यवतमाळमध्ये दाखल झाले होते
पोस्टल ग्राऊंडवरून मोर्चाला सुरूवात झाली होती
Post a Comment