काश्मिरी हिंदूंचा आवाज बुलंद करण्यासाठी आयोजित हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्याचा पुणे येथील राष्ट्रप्रेमी हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !
Posted by
vidarbha
on
10:00:00 PM
in
|
|
हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांना नामजप करून श्रद्धांजली अर्पण करतांना राष्ट्रप्रेमी नागरिक |
|
श्री. राहुल कौल (बोलतांना) आणि बसलेले (डावीकडून) श्री. सुनील घनवट, अधिवक्ता श्री. देवदास शिंदे, श्री. अभिजीत देशमुख |
|
सभा यशस्वी करण्यासाठी गटचर्चेच्या माध्यमातून नियोजनात सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ |
पुणे, २४ सप्टेंबर (वार्ता.) - विश्वभरातील कोणत्याही देशात देशवासियांनाच
निर्वासिताचे जिणे जगण्याची वेळ आली नसेल; पण ही दुर्दैवी स्थिती बहुसंख्य
हिंदू असलेल्या हिंदुस्थानात हिंदूंच्या वाट्याला आली आहे. पृथ्वीचे
नंदनवन समजले जाणारे काश्मीर पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच धुमसत असून
तेथील हिंदूंना प्रतिदिन जिहादी आतंकवादाचा सामना करावा लागत आहे.
सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे, तसेच
धर्मबांधवांविषयीच्या भावना बोथट झाल्याने हा प्रश्न अजूनही चिघळतोच आहे.
एकीकडे ही स्थिती असतांना दुसरीकडे हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेक
राष्ट्रप्रेमी हिंदुत्वनिष्ठांची देशव्यापी चळवळ चालू आहे. या निमित्ताने
हिंदु राष्ट्र स्थापनेतील महत्त्वाचा टप्पा म्हणून काश्मिरी हिंदूंच्या
पुनर्वसनाची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती
समिती, पनून कश्मीर, काश्मिरी हिंदु महासभा आणि लष्कर-ए-हिंद यांच्या
संयुक्त विद्यमाने देशभरात विविध ठिकाणी धर्मजागृती सभांचे आयोजन करण्यात
येत आहे. पुण्यातही २३ ऑक्टोबरला विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन
करण्यात आले आहे.
देशाच्या विविध प्रांतातील
हिंदुत्ववादी नेते सभेला संबोधित करणार आहेत. २२ सप्टेंबर या दिवशी धनकवडी
भागातील विणकर सभागृह येथे या धर्मसभेच्या पूर्वनियोजनासाठीची पहिली बैठक
पार पडली. या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी ही धर्मसभा यशस्वी करण्याचा
आणि काश्मिरी हिंदूंचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार केला. या वेळी यूथ फॉर
पनून कश्मीरचे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल, लष्कर-ए-हिंदचे
प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता श्री. देवदास शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे
महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट व्यासपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख
यांनी केले. या बैठकीसाठी ४५ हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय यांचे १२५ हून
अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. सनातनच्या संत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
यांचीही बैठकीला वंदनीय उपस्थिती होती.
Post a Comment