*अचलपुर मध्ये उत्साहाने व शांततेत ईद संपन्न*
Posted by
vidarbha
on
2:00:00 PM
in
|
अचलपूर /प्रमोद नैकेले /----
लोकांनी एकमेकांना भेटून दिल्या शुभेच्छा
पोलिस अधीक्षकांनी फूल देवून दिल्या शुभेच्छा


अचलपुर मध्ये ईद उल अज़हा इद ए कुरबा मंगलवार ला मोठया उत्साहाने व शांततेत संपन्न करण्यात आली। ईद मध्ये जाण्याकरीता जुलूस जामा मस्जिद पासून सकाळी 9 वाजता निघाला।जुलूस चे नेतृत्व काज़ी ए शहर सय्यद अबरार हुसैन व शहर ए काज़ी सय्यद गयासोद्दीन साहेब यांनी केले.या एतेहासिक जुलूस मध्ये समोर शाही नौबत व एक झेंडा होता.शहरातील सर्व भागातील लोक जुलूस मध्येें सहभागी झाले होते. ईदगाह वर 9:35 वाजता जुलूस पोहचला जेथे खतिब साहेब व काज़ी साहेब समाजबांधवांना मार्गदर्शन केले. काज़ी सय्यद गयासोद्दीन यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की, गैर कानूनी काम केल्यानंतर येथे जी शिक्षा मीळते त्यापेक्षा जास्त शिक्षा आपल्या गुन्ह्याची मीळते.पोलीस अपराधावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या वर आज लक्ष ठेवून आहे पण यापेक्षा जास्त लक्ष त्या आपल्या ख़ुदाचे आहे. जो एक दगडात एक छोट्याश्या किड्याला सुध्दा पाहतो आहे.म्हणून चांगले काम करा आणि काही वाईट काम व चुका करू नका. ज्यामुळे परमेश्वर नाराज़ होते. ईश्वराच्या सांंगीतलेल्या मार्गावर चालायचे व आपले जीवन सफल बनवावे.व्यसन करणारे आपल्या जिवनाचाच नाही तर सर्व कुटंबाचा नाश करतात.स्वतः तर बर्बाद होताे आणि आपल्या परिवाराला सुध्दा बर्बाद करतात. यानंतर नमाज़ ची पध्दत सांगण्यात आली. अज़ान बाबा भाई पेंचिस वाले आणि नमाज़ खतिब साहेब यांनी घेतली.ख़ुत्ब्यानंतर प्रार्थना झाली व ईद च्या शुभेच्छा लोकांनी एकमेकांना दिल्या. याप्रसंगी अमरावती ज़िल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक लखमी गौतम हे प्रथमच अचलपुर च्या शाही ईदगाह वर शुभेच्छा देण्यासाठी आले होते.काज़ी साहेब व खतीब साहेब यांना फूल देवून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व सण व उत्सव एक साथ व शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले. यावेळी ईदगाह वर कांग्रेस के मामा तरवले,श्रीकांत झोडपे,बबलू देशमुख,हरिचन्द्र मुगल,,इकबाल पटेल,फ़िरोज़ खान,,आरपीआई चे मस्तान कुरैशी,मोअज़हरोद्दीन,बाकिर अंसारी,मुदस्सिर नज़र,वसीम कुरैशी,खालिक भाई, सय्यद सलीम कुरैशी, कौकब खान यांनी सुध्दा उपस्थितीतांना शुभेच्छा दिल्या.
*पोलिसांचा तगडा बंदोबस्त*- अचलपुर चे ठानेदार नरेंद्र ठाकरे व सरमसपुरा चे ठानेदार मूकेश गावंडे यांचे मार्गदर्शनात पोलिस चा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रथम ड्रोन कँमे-याचा उपयोग केला ज्याव्दारे ईदगाह परिसरावर बारुक नज़र ठेवण्यात आली होती.
Post a Comment