डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुरो(अधो)गामी आणि अन्वेषण यंत्रणा यांच्याकडून केल्या जाणार्या सनातनच्या अपकीर्तीविषयी पुणे येथील ज्येष्ठ समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी मांडलेली परखड मते
१. सनातन संस्थेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी सतत वैचारिक संघर्ष केला आहे. त्यांना जर डॉ. दाभोलकर यांची हत्याच करायची असती, तर विरोधी लेखन न करता त्यांनी न बोलता आपले काम साधले असते.
२. दाभोलकर परिवार आरंभापासून सनातनच्या मागे लागल्याने पोलिसांची दिशाभूल झाली आणि खरे मारेकरी निसटले. दाट शक्यता आहे की, एखाद्या मांत्रिकाने त्याच्या व्यवसायावर गदा येऊ नये; म्हणून सुपारी देऊन दाभोलकरांची हत्या केली असेल; पण एकाही मांत्रिकाला पकडले गेले नाही. हिंदुत्वनिष्ठ संघटनांचाच वेठीला धरल्यामुळे खर्या मारेकर्यांना पसार व्हायला संधी मिळाली.
३. राज ठाकरे यांच्या मते काँग्रेस सरकारला अंधश्रद्धा निर्मूलनाचे विधेयक पारित करायचे होते; म्हणून त्यांनी दाभोलकरांची हत्या घडवली. राज ठाकरे यांच्या या मताचा पाठपुरावा का नाही केला गेला ?
४. काश्मीर, आसाम, केरळ, अरुणाचल प्रदेश आणि हरियाणा येथे अनेक संघ स्वयंसेवकांच्या हत्या होतात. त्याची कुणीच का चर्चा करत नाही ? एकटे दाभोलकर कोण मोठे लागून गेले ?
५. श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना वयाच्या ९५ व्या वर्षी धमकीचे दूरभाष येतात. मलाही धमकीचे दूरभाष येतात. हा वैचारिक लढा समजायचा का ? कै. निनाद बेडेकर, डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या शिवचरित्रावरील सभा बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. ही गुंडगिरी नाही का ? ही विचारवंतांची मुस्कटदाबी नाही का ?
६. प्रसारमाध्यमांनी बातम्या द्याव्यात. न्यायाधिशांसारखे निर्णय देऊन पोलिसांची दिशाभूल करू नये
Post a Comment