दाभोलकरांनी न्यासांच्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्या कोठे व्यय केल्या, याचा तपास केल्यास सत्य बाहेर येईल !
Posted by
vidarbha
on
6:30:00 PM
in
|
सातारा येथे सनातनचे
प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचे परखड मत !
|
डावीकडून विश्व हिंदु परिषदेचे सातारा शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर,
ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज, सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक,
हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे आणि श्रीशिवप्रतिष्ठान
हिंदुस्थानचे श्री. सुधन्वा गोंधळेकर
|
सातारा - दाभोलकर कुटुंबियांनी
अंधश्रद्धा निर्मूलन समिती या न्यासामध्ये आर्थिक घोटाळे केले. त्यांनी
आपल्या ट्रस्टचे आर्थिक ताळेबंदही योग्य त्या कालावधीत धर्मादाय आयुक्तांना
वेळेवर सादर केलेले नाहीत, तसेच दाभोलकर यांच्या परिवर्तन या न्यासाने
व्यसनमुक्तीसाठीच्या कार्यासाठी म्हणून अंबांनींकडून १ कोटी रुपये घेतले.
अजूनही न्यासाला अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळाल्या असू
शकतात. एवढे कोट्यवधी रुपये घेऊन न्यासाने व्यसनमुक्तीचे असे काय कार्य
केले ? हे पैसे कुठे व्यय झाले ? अन्वेषण यंत्रणांनी या आर्थिक
घोटाळ्याच्या अनुषंंगाने का तपास केला नाही ? अन्वेषण यंत्रणांना खरेच डॉ.
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण करायचे असेल, तर त्यांनी दाभोलकर
कुटुंबियांचीही चौकशी करावी. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एकूण आर्थिक
कारभार हा संशयास्पद असून न्यासातील आर्थिक घोटाळ्याची चौकशी केल्यास
त्यातून सत्य बाहेर पडू शकेल, असे परखड प्रतिपादन सनातन संस्थेचे
राष्ट्र्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. येथील राजवाडामधील
पत्रकार परिषद कार्यालयात २२ सप्टेंबर या दिवशी समस्त हिंदुत्वनिष्ठ
संघटनांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी विश्व हिंदु परिषदेचे शहरमंत्री श्री. जीतेंद्र वाडेकर, ह.भ.प.
क्षीरसागर महाराज, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सुधन्वा गोंधळेकर
आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनावणे हे उपस्थित होते.
श्री वर्तक पुढे म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी
अन्वेषण यंत्रणांनी एकांगी अन्वेषण करत प्रारंभीपासून सनातन संस्थेला नाहक
लक्ष्य केले. या प्रकरणी अन्वेषण यंत्रणांनी खरे आरोपी सापडत नसल्यानेच आणि
पुरोगाम्यांच्या दबावाखाली येऊन सनातनचे निष्पाप साधक डॉ. वीरेंद्रसिंह
तावडे यांना अटक केली आहे. अन्वेषण यंत्रणांनी सनातन संस्थेच्या आश्रमावर
छापा मारून तेथील औषधसाठा कह्यात घेऊन कपोलकल्पित कहाण्या रचल्या.
आश्रमामध्ये शेड्युल्ड एच् आणि एच् १ ही औषधे जप्त करून नार्कोटिक ड्रग्ज
सापडल्याचा कांगावा केला. यावरूनच अन्वेषण यंत्रणांचा सनातनला अपकीर्त
करण्याचा उद्देश स्पष्ट होतो. आतापर्यंतच्या आलेल्या अनुभवावरून पोलीस,
तसेच अन्वेषण यंत्रणा अंनिसवर मेहेरबान असून केवळ सनातनला म्हणजेच
हिंदुत्वाला दडपण्यासाठीच षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे अन्वेषण
यंत्रणांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत राहून
निष्पक्षपातीपणे अन्वेषण करावे.
क्षणचित्र : या पत्रकार परिषदेला २० हून अधिक विविध वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या यांचे पत्रकार उपस्थित होते.
Post a Comment