गुंड घेवुन महिला थेट ग्रा.पं. कार्यालयावर.
पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा.
चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-
तालुक्यातील बग्गी येथे सामाजिक व धार्मिक कार्यक्रम नेहमी उत्साहात सुरू असतात. सद्या गावात दिंडी उत्सव सूरू असतांना मागील ६ दिवसांपासुन पाणी पूरवठा बंद असल्याने त्रस्त महिला गुरूवारी पाण्याचे गुंड घेवुन थेट ग्रामपंचायत कार्यालय परीसरात पोहचल्या होत्या. व घागर फोडो आंदोलनाचे निवेदन सपंरच व सचिव यांना सादर केले. सचिवांनी प्रश्न निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तरीही पुरवठा सुरळीत न झाल्यास उपोषणाला बसण्याचा सुध्दा इशारा दिला आहे.
शहरापासुन १० की.मी. अंतरावर असलेल्या बग्गी हे साधारण ३ हजार लोकवस्तीचे धार्मिक गाव आहे. मात्र हे गाव अनेक समस्यांनी ग्रासले आहे. यामध्ये पाणी प्रश्न, नादुरूस्त नाल्या, अपुर्ण सिमेंट रोड, नालीच्या कडेलाच घाण कचरा असल्याने डेंगू रोगाची लक्षणे, अशा अनेक समस्या आहे. मात्र यांमधील अतीमहत्वाचा पाणी प्रश्न नेहमीच गावकऱ्यांसाठी डोकं दुखी ठरत आहे. ३ दिवसानंतर येणारे पाणी ६ दिवसानंतर येत असल्यामुळे महिलांनी गुरूवारी घागरा फोडो आंदोलन केले. गावातील महिला पाण्याचे गुंड घेवुन थेट ग्रामपंचायत कार्यालयात पोहचल्या होत्या. व पाणी पुरवठा तत्काळ सुरळीत करण्याचे निवेदन सरपंच व सचिव यांना देवुन चर्चा केली. यावेळी महिलांनी पाणी पुरवठा अध्यक्षांचा हलगर्जीपणा सुध्दा व्यक्त केला. सचिवांनी महिलांना प्रश्न निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले. तरीही पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा सुध्दा दिला आहे. यावेळी सौ. शोभा हारगुडे, विजया चव्हाळे, नलीनी होले, शांताबाई मोहोड, आशाबाई ठाकरे, तुळसाबाई उरकुडे, सुशीलाबाई शेलोकार, ज्याेतीबाई देशमुख, सरीता चव्हाळे, अरूणा खडसे यांसह प्रशांत भेंडे, रमेश हारगुडे, रमेश बोडखे, पुंडलीक रामटेके, गोपाल गजबे, नरेश घोडे यांसह अनेकांची उपस्थीती होती..
Post a Comment