अमरावती--
जम्मू कश्मीर भागातील उरी येथे अतिरेक्यांकडून झालेल्या हल्ल्यात शहिद झालेला अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील भूमीपूत्र पंजाब उर्फ विकास जानराव उईके यांना श्रद्धांजली म्हणून येथील माहेश्वरी महिला मंडळाने रक्तदान महायज्ञ हा स्तुत्य उपक्रम सुरु करुन राज्यभरात चांगला पायंडा पाडला आहे असे प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे यांनी केले.
येथील माहेश्वरी भवन मध्ये आयोजित रक्तदान महायज्ञ शिबीराचे उद्घाटन ना. पोटे यांच्याहस्ते झाले यावेळी ते बोलत होते. आमदार श्रीकांत देशपांडे, शहिद पंजाब उईके यांच्या मातोश्री बेबीताई, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, माहेश्वरी पंचायतचे अध्यक्ष सुभाष राठी, रक्तदान महायज्ञ समितीचे प्रमुख महेंद्र भुतडा, सुरेश साबु, पुष्पलता, प्रभा झंवर व माहेश्वरी समाजातील मान्यवर उपस्थित होते.
ना.पोटे यांनी यावेळी शहिद पंजाब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, माहेशवरी महिला मंडळाने शहिद पंजाब यांना श्रद्धांजली बरोबरच रक्तदान महायज्ञ हा स्तुत्य उपक्रम घेतला त्याबद्दल माहेश्वरी महिला मंडळाचे कौतुक केले. उईके कुटुंबाची देशावर अपार श्रद्धा आहे. त्यांच्या मुलाने देशासाठी बलिदान दिले आहे. माहेश्वरी समाजाने शहिदांच्या कुटुंबांना तसेच पाल्यांना मदत म्हणून दररोज 5 रुपये याप्रमाणे वर्षासाठी 1,800 रुपये जमा करावेत. आपण पंजाबचे लहाने भाऊ यांना नोकरी मिळवून देण्यासाठी अवश्य प्रयत्न करु.
आ.श्रीकांत देशपांडे यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले. त्यांनी यावेळी माहेश्वरी महिला मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक म्हणाले रक्तदानामुळे एखाद्या रुग्णाचा जीव वाचतो, रुग्णालयात रक्ताची नेहमीच गरज असते. रक्तदान हे फार मोठे कार्य आहे, हजारो लाखो जणांचे जीव वाचविणारा हा उपक्रम घेतल्याबद्दल माहेश्वरी महिला मंडळाचे कौतुक केले. पोलीस आयुक्त मंडलिक पुढे म्हणाले, उईके परिवाराने देशासाठी फार मोठे बलिदान केले आहे. शहिद पंजाबचे बलिदान देशासाठी झाले आहे. या भूमीपुत्राच्या सलामीसाठी हा कार्यक्रम महिला माहेश्वरी मंडळाने घेतल्याबद्दल त्यांने कौतुक करुन धन्यवाद दिले

Post a Comment