चांदुर रेल्वे-/शहेजाद खान -/--
तालुक्यातील घुईखेड हे गाव गेल्या १० वर्षांपासुन बेंबळा पुनर्वसनात गेले असुन पुनर्वसन झाल्यानंतर गावातील मुलभुत समस्यांवर अद्यापही तोगडा काढलेला नाही. त्यामुळे घुईखेड भाजपाच्यावतीने विनंती अर्ज समीतीचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार डॉ. आशिष देशमुख यांना निवेदनसादर करून गावातील मुलभुत सुविधा तात्काळ सोडविण्याची मागणी केली आहे.
चांदुर रेल्वेवरून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या घुईखेड या गावाचे पुनर्वसन बेंबळा प्रकल्पांतर्गत गेल्या १० वर्षांपुर्वी झाले. मात्र पुनर्वसनानंतर गाव भकास झाले आहे. कारण गावात नागरीकांना अद्यापही पुर्णपणे मुलभुत सोई सुविधा पुरविण्यात आलेल्या नाही. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे गावातील समस्या पुर्नत्वास नाही जात आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा वहीवाटीचा रस्ता बंद झाल़्यामुळे पुन्हा सर्वे करून प्रश्न निकाली काढण्यात यावा, शेतकऱ्यांना सोयीनुसार रस्ते बांधकाम व महसुली नकाशा दुरूस्त करून देण्यात यावा, घरकुल योजनेकरीता नव्याने सर्वे करून अत्यंत गरजु प्रकल्पग्रस्तांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, गावात नागरी सुविधा गावठाण्यातील रस्ते, नाल्या ओलांडी पुल दुरूस्ती तसेच ग्रामपंचायत ईमारत, स्मशानभुमी, बाजारील ओटे यांचे काम सुरू करण्यात यावे, उपसा सिंचन प्रकल्प राबवुन शेतकऱ्यांना ओलीताच्या सोई करून देण्यात याव्या, गावातील ई क्लास जमीन निश्चीत करण्यात यावी जेणेकरून अतिक्रमनाचा मुद्दा उद्भवनार नाही, खारवगळ नदीवर पुल बांधुन देण्यात यावा, बेघरांना सुलभ रीतीने भुखंड वाटप करण्यात यावे, कायम स्वरूपी पुनर्वसन अधिकारी देण्यात यावा यांसह अनेक मागण्यांचे निवेदन भाजपातर्फे शासनाच्या वतीने नुकतेच पुनर्वसनातील समस्यांच्या निराकरणासाठी गठीत करण्यात आलेल्या विधानसभा विनंती अर्ज समीतीचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार डॉ. आशिष देशमुख यांना नुकतेच सादर केले. व समस्यांचा निपटारा त्वरीत होण्याकरीता जिल्हा प्रशासनाला सुचना देण्यात याव्या जेणेकरून प्रशासनाकडुन दिरंगाई होणार नाही अशी मागणी केली.
निवेदन देतेवेळी भाजपा जिल्हा कार्यकारीणी सदस्य आशुतोष गुल्हाने, घुईखेड भाजपाध्यक्ष भानुदास बनकर, घुईखेड बुथ प्रमुख संजय गिरूळकर, शंकर भोयर यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते..

Post a Comment