धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने वणी (जिल्हा यवतमाळ) येथे विविध उपक्रम
Posted by
vidarbha
on
5:55:00 AM
in
|
महिलांनी तणावमुक्त जीवन
कसे जगावे याविषयी मार्गदर्शन
|
महिलांना मार्गदर्शन करतांना सौ. कल्पना खामणकर
|
वणी (जिल्हा यवतमाळ) - येथे धर्मसेवा प्रतिष्ठान
न्यासाच्या वतीने तणावमुक्त जीवन कसे जगावे, याविषयी सौ. काळे यांच्या
सभागृहात सौ. कल्पना खामणकर यांनी मार्गदर्शन केले. काही महिलांनी त्याचा
लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. काळे, सौ. रोडे, सौ. ठाकरे
यांनी प्रयत्न केले.
विनामूल्य मधुमेह तपासणी शिबीर
|
शिबिराचा लाभ घेतांना महिला
|
वणी (जिल्हा यवतमाळ) - येथे २० सप्टेंबर या दिवशी धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने मधुमेह तपासणी शिबीर घेण्यात आले.
डॉ.
जे. के. जुनगरी यांनी त्यांच्या सदाशिवनगर येथील दवाखान्यात या शिबिरासाठी
साहाय्य केले. या वेळी १४ जणांनी शिबिराचा लाभ घेतला. या उपक्रमासाठी
धर्मसेवा प्रतिष्ठानच्या सौ. मंदा पारखी, सौ.अरुणा ठाकरे, सौ. कविता आस्वले
आणि श्री. लहू खामणकर यांनी प्रयत्न केले.
Post a Comment