श्री. प्रमोद मुतालिक |
पणजी - श्रीराम सेनेचे अध्यक्ष तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री.
प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांंच्यावरील गोवा प्रवेशबंदी राज्यातील
भाजप शासनाने १५ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. राज्यातील दोन्ही
जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांच्या अहवालानुसार ही प्रवेशबंदी वाढवली आहे.
प्रखर हिंदुत्वनिष्ठ मुतालिक यांच्यावरील बंदीचे हे तिसरे वर्ष चालू आहे.
१९ ऑगस्ट २०१६ या दिवशी श्री. मुतालिक यांच्यावरील बंदीला दोन वर्षे
पूर्ण झाली आहे. श्री. मुतालिक यांच्यावर सध्या असलेली बंदी १५ सप्टेंबर या
दिवशी संपली. गृह खात्याचे अपर सचिव रोहन कासकर यांनी नव्याने आदेश काढून
श्री. मुतालिक यांच्यावरील राज्यातील प्रवेश बंदी १५ जानेवारी २०१७ पर्यंत
वाढवली आहे. फौजदारी दंड संहिता कायदा १९७५ च्या १४४ कलमातील तरतुदीचा
उपयोग करून राज्य शासनाने ही बंदी चार मासांसाठी वाढवली आहे. उत्तर आणि
दक्षिण गोव्यातील पोलीस अधीक्षकांनी श्री. मुतालिक यांच्यावरील बंदीचा काळ
वाढवण्याची आवश्यकता आहे, असा अहवाल दिल्यानंतर शासनाने हा निर्णय घेतला
आहे. बंदी उठवल्यानंतर राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते, तसेच धार्मिक
सलोखा बिघडू शकतो. राज्यातील जनतेच्या मनात भीती निर्माण होऊ शकते, असे
शासनाने आदेशात म्हटले आहे.
Post a Comment