एक तरी चमत्कार करून दाखवा व 21 लाख रूपये घेवुन जा- अनिसचे शंकर महाराजांना आवाहन
चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-
गाडगे महाराज हे खरे संत ज्यांनी स्वताच्या मुलीलाही स्वतः काढलेल्या आश्रमशाळेत राहु दीले नाही. येथे मात्र स्वतःच्या मूली, जावई, नातू, यांच्या भल्यासाठी शंकर महाराजांनी आश्रमशाळा काढल्या आहे. गेल्या अनेक वर्षात अनेक विद्यार्थ्यांचे, सेवकांचे संशयास्पदरित्या मृत्यु झाले. आज अनेक मोठ मोठे शिकलेले नेते, अधिकारी या भोंदु बाबांच्या पायावर माथा टेकवितांना दिसतात. कारण त्यांनी फ़क्त शिक्षण घेतले, विचार करने ते शिकलेच नाही. त्यांना कधी प्रश्नच पडत नाही की भोंदु बाबांची, महाराजांची खरी ताकद म्हणजे समाजाचे अज्ञान आहे अशा परखड़ शब्दात अंधश्रद्धा निर्मूलनचे संघटक दिलीप सोळंके व अैड. गणेश हलकारे यांनी आपले मत व्यक्त केले.
मागील महिन्यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील शंकर महाराज यांच्या आश्रम शाळेत नरबळीचा प्रयत्न झाला होता. अनेक मोर्चे, बंद चे आयोजन ही झाले याचाच एक भाग म्हणून शनिवारी 24 सप्टेंबर रोजी स्थानिक शिवाजी कन्या शाळेच्या रंगमंचावर तालुक्यातील अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती व इतर पुरोगामी संघटनांनी मिळून व्याख्याण मालेचे आयोजन केले होते. यावेळी मंचावर अैड. गणेश हलकारे, दिलीप सोळंके, अनीसचे जिल्हा संघटक शेखर पाटिल,अशोक सोनारकर, माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले आदि उपस्थित होते. पुढे बोलतांना दीलीप सोलंके यांनी भोंदु बाबांची निर्मिति कशी होते व ते भक्तांना कसे मुर्ख बनवतात याचे प्रात्यक्षिक करुण वर्णन केले. पैसा, प्रशिद्धि, व वासना हे मिळविन्यासाठी आज प्रत्येक गावागावत असे भोंदु महाराज निर्माण होत आहे, अपल्यात ईश्वरी शक्ति असल्याचा भास निर्माण करुणहे महाराज लोकांमधे भ्रम निर्माण करतात. मोह, माया, मोक्ष इत्यादि गोलगोल शब्द वापरून अतिशय लय बद्ध शब्दात प्रवचन देतात. 'कानाला बर वाटल की डोक्याला ते खर वाटत' ही मानसिकता आहे त्याचाच फायदा हे भोंदु घेतात. मग त्यांचे मठ, आश्रम, तैयार होतात व सुरु होतो त्यांचा धंदा. धामणगाव येथील शंकर महाराज त्याचेच उदाहरण असून त्यांच्या पुस्तकांमधे अनेक चमत्कार लिहले आहे. महाराजांची मानवा सोबतच निसर्गावर देखील नियंत्रण आहे असा उल्लेख आहे. तेव्हा एक तरी चमत्कार करुन दाखवा व 21 लाख रूपये घेऊन जा असे ही आवाहन गणेश हलकारे यांनी शंकर महाराजांना दिले. यावेळी महाराजांची संपत्तिचे विवरण देत, सुरवातीला केवळ ढोर चारण्याचे काम करणारे हे महाराज आज लखोपती कसे झाले ? सुरवातीला केवळ 5 एक्कर जमीन आज शेकडोच्या घरात गेली ती कशी असा सवालही यावेळी हलकारे यांनी उपस्थित केला.शंकर महाराज यांच्या आश्रमात अनेक वेळा नरबळीचा प्रयत्न झाला आहे त्याचा अप्रत्यक्ष रित्या शंकर महाराजांशी संबध आहे. तेव्हा त्यांनी पुढे येऊन यावर बोलले पाहिजे असेही यावेळी हलकारे यांनी मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सागर दुर्योधन यांनी केले तर कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी सुमेध सरदार, संजय चौधरी,विनोद जोशी,अैड शिवाजी देशमुख, संदीप ढोने, विजय रोडगे, शेखर बद्रे, अनंत देशमुख,अजय वाघ, गणेश गावंडे,राहुल तायडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील अनेक महिलांसह शेकडो लोक उपस्थित होते.
Post a Comment