BREAKING NEWS

Monday, September 19, 2016

धर्मांतर करण्याचे षड्यंत्र हाणून पाडा ! - श्री. चंद्रमणी चौबे, विहिंपच्या कोकण प्रांत मठमंदिर विभागाचे अध्यक्ष

डोंबिवली येथे हिंदु धर्मजागृती सभा 

बोलतांना श्री. चंद्रमणी चौबे (उजवीकडे), बसलेले (डावीकडून)
सौ. दीक्षा पेंडभाजे, सौ. सुनीता पाटील आणि श्री. प्रसाद वडके

        डोंबिवली - भाषा, जात, पात, संप्रदाय यांत लोकांना गुरफटत ठेवून हिंदु धर्म, रुढी, परंपरा यांना खिळखिळे करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केला जात आहे. लोकांनी मतभेद विसरून एक व्हावे. हिंदूंना विविध अमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र हाणून पाडायला हवे, असे प्रतिपादन विहिंपच्या कोकण प्रांत मठमंदिर विभागाचे अध्यक्ष श्री. चंद्रमणी चौबे यांनी केले. ते १८ सप्टेंबर या दिवशी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. दीक्षा पेंडभाजे, रणरागिणी शाखेच्या सौ. सुनीता पाटील आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके उपस्थित होते.
        या वेळी शिवसेनेचे श्री. रवी पाटील, भाजपचे नगरसेवक श्री. जालिंदर पाटील, वॉलीबॉल ग्रुपचे अध्यक्ष श्री. कामदेवजी भारतद्वाज, दावडी येथील भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ. ज्योती अय्यर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री. गुरुनाथ लोते, दावडीचे माजी सरपंच श्री. बंडुशेठ सोरखदे, शिवसेनेचे कल्याण तालुका ग्रामीणचे उपप्रमुख श्री. बंडु पाटील, भाजप उत्तर भारतीय महिला मोर्च्याच्या डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष श्रीमती लालदेई रामभवन यादव यांची विशेष उपस्थिती लाभली, तर सर्वश्री सनिल मुंडे, बंडूशेठ सोरखदे, धर्मनाथ राजभर, अर्जुन मंडपवाला यांचे विशेष सहकार्य लाभले.
अन्य मान्यवरांनी मांडलेली मते
महिलांनी स्वसंरक्षण आणि धर्मशिक्षण घेऊन 
कणखर व्हायला हवे ! - सौ. सुनीता पाटील, रणरागिणी शाखा
        आज महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. केवळ मेणबत्ती मोर्चे काढून निषेध करून या घटना थांबणार नाहीत, तर त्यासाठी प्रत्येक महिलेने स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि धर्मशिक्षण घेऊन कणखर व्हायला हवे. तसे झाल्यासच आपण स्वतःसमवेत धर्माचेही रक्षण करू शकतो.
हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या पर्वात सहभागी व्हा ! 
- श्री. प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती
        हिंदुत्वनिष्ठ संघटना, संत आणि राष्ट्रपुरुष यांना अपकीर्त करण्याचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र चालू आहे. आतंकवादही दारात येऊन ठेपला आहे. त्यामुळे सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांच्या निराकरणासाठी संघटन आणि संघर्ष यांच्या माध्यमातून साधना करत हिंदु राष्ट्र स्थापनेच्या पर्वात सहभागी व्हा !
देवतांच्या विडंबनाकडे हसून पहाणे हे 
दुर्दैव ! - सौ. दीक्षा पेंडभाजे, सनातन संस्था
        हिंदूच्या देवतांविषयी काहीही बोलले जाते. त्यांची विडंबनात्मक चित्रे काढली जातात. आपण हसून पुढे जातो, हे आमचे दुर्दैव आहे. हिंदु धर्मावर होणार्‍या विविध आघातांविषयी सनातन संस्था लोकांना जागृत करत आहे. हेच निधर्म्यांच्या डोळ्यांत खुपते आणि त्यातूनच संस्थेवर विविध प्रकारचे आरोप होतात.
पोलिसांकडून समितीच्या कार्यकर्त्यांची चौकशी !
        सभेच्या आधी दोन दिवस समितीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी चौकशी केली, तसेच सभेला येणार्‍या वक्त्यांची माहिती घेतली. आतंकवादविरोधी पथकाचे २, तसेच गुन्हे शाखेचे ५ असे मिळून ७ पोलीस सभेच्या ठिकाणी उपस्थित होते.
आढावा बैठक !
स्थळ : राम मंदिर, दावडी गाव, डोंबिवली (पूर्व).
दिनांक : २१ सप्टेंबर
वेळ : रात्री ८.३०

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.