धनबाद (झारखंड) येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात मागणी !
धनबाद शहरात आंदोलन करतांना धर्माभिमानी |
धनबाद (झाडखंड) - येथील रणधीर वर्मा चौकामध्ये २२ सप्टेंबरला
राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. सनातन संस्थेचे निरपराध साधक डॉ.
वीरेंद्रसिंह तावडे यांना कॉ. पानसरे हत्या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकवण्यात
येऊन त्यांचा पोलिसांकडून छळ करण्यात येत आहे. याद्वारे हिंदुत्वाचे कार्य
करणार्या सनातन संस्थेची अपकीर्ती करण्यात येत आहे. हे दुर्दैवी आणि
क्लेषदायक आहे. या प्रकरणी डॉ. तावडे आणि सनातन संस्था यांना त्वरित न्याय
मिळावा, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती
समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, समितीच्या रणरागिणी
शाखेच्या कु. निशाली, समितीचे पूर्व आणि उत्तरपूर्व भारताचे समन्वयक श्री.
चित्तरंजन सुराल आदी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.
आंदोलनाद्वारे पुढील मागण्या करण्यात आल्या
१. डॉ. तावडे यांच्या संदर्भात नियमबाह्य कारवाई करणारे अन्वेषण अधिकारी
असणारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यावर योग्य कारवाई करण्यात
यावी.
२. डॉ. तावडे यांना मारहाण करणारे अधिकारी रवि पाटील आणि पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांच्याविरोधातही कारवाई करण्यात यावी.
क्षणचित्र : या आंदोलनाच्या वार्तांकनासाठी ५ वृत्तवाहिन्यांचे आणि १९ दैनिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Post a Comment