●
गजानन काळुसे ◆ सिंदखेड राजा●
सिंदखेड राजा तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने 31 ऑगस्ट रोजी तहसिलदार कणसे यांना निवेदन देण्यात आले एसईसीसी(SECC) च्या आधारे योजना पात्र गरीब गरजु बेघरांना घरकुला पासून वंचित असल्यामुळे निवेदन देण्यात आले.या निवेदनामध्ये तालुका काँगेस कमिटीच्या प्रमुख मागण्या समाजातील जातिनिहाय जनगणनेच्या आधारे चुकीच्या सव्हेक्षणामुळे अन्याय झालेल्या सर्व गरीब व पात्र लाभाथ्याना दारिद्रय रेषेखाली समावेश करावा,चुकीच्या पध्दतीने केलेल्या सव्हेक्षणा च्या याद्या तायडीने रद् कराव्यात, एसईसीसी(SECC) चे चुकीचे निकष तायडिने बदलावे, बंद केलेल्या इंदिरा गांधी, माता रमाई, व शबरी यांच्या नावाच्या आवास योजना तातडीने परत सुरु कराव्यात,जुन्या प्रतीक्षा यादी तील लाभाथ्यानाच प्रथम घर कुले द्यावेत या प्रमुख मागण्यासह काँग्रेस कमिटिच्या वतीने सिंदखेड राजा तहसिलदार कणसे यांना देण्यात आले.या निवेदनावर तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवदास रिंढे,बद्रीभाऊ वाघ, जगन ठाकरे, सुभेदार मेजर द्वारकीनाथ म्हस्के ,संपत दादा सानप, योगेश पवार, युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानंद मुंढे ,महेश जाधव, रंगनाथ डोईफोडे, ज्ञानदेव चपटे, बाबुराव देशमुख, रामदास रिढे, जुनेद अली, शे कमर मुसा, शे अलीम, सोपानराव खरात , मदन आघाव , आदिच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहे.
Post a Comment