रियाद (सौदी अरेबिया) - येथील
एका मुसलमान तरुणाने मी नास्तिक आहे, असे ट्विट केल्याप्रकरणी त्याला १०
वर्षांचा कारावास आणि २ सहस्र कोडे मारण्याची शिक्षा देण्यात आली. एवढेच
नाही, तर त्याला अनुमाने ४ लक्ष रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
या तरुणाचे नाव सार्वजनिक करण्यात आलेले नाही. त्याला अटक
करण्यापूर्वी त्याने ६०० ट्विट केले होते. यात त्याने, मला विचार व्यक्त
करण्याचे स्वातंत्र्य आहे, असे मत व्यक्त करतांनाच ईश्वराचे अस्तित्वही
नाकारले होते. या देशातील कायद्यानुसार नास्तिक असलेल्यांना आतंकवादी
समजण्यात येते. त्याचे ट्विट कुराणचा उपहास करत होते, असे पोलिसांना आढळून
आले होते. त्याने सर्व नबींनी खोटे सांगितले आहे, धार्मिक शिक्षण द्वेष
पसरवणारे आहे, अशी मतेही व्यक्त केली होती.
Post a Comment