- हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक व्हायला हा भारत आहे कि पाक ?
- अपुर्या पोलीस बळामुळे गोंधळ



उमरखेड - अनंतचतुर्दशीच्या दिवशी येथील शिवाजी वॉर्ड परिसरातील छावा गणेशोत्सव मंडळाची श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक शहरातील रोहिलीपुरा या भागात आल्यावर मिरवणुकीवर दगडफेक चालू झाली. यात तीन पोलिसांसह १५ भाविक घायाळ झाले. या वेळी पोलीस बंदोबस्त अपुरा असल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी अश्रूधुराच्या दोन नळकांड्या फोडल्या; मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली. त्याच वेळी आलेल्या पावसामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले. या घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उमरखेडला भेट दिली. दगडफेक झाल्याचे कळताच शहरातील अन्य गणेशोत्सव मंडळांनी काही काळ मिरवणुका जागेवरच थांबवल्या होत्या.
Post a Comment