*नावाप्रमाणेच अहसानभाई यांनी दाखवली मानवता*
आजकाल सामाजिक एकता व मानवतेवर बोलनारे भरपुर पाहायला मिळतात पण प्रत्यक्षात वागणारे बोटावर मोजण्याइतके सापडतात असेच एक गृहस्थ अहसानभाई अमरावती येथील नागपूरी गेट जवळ झालेल्या अपघातात धावून आले व अनोळखी इसमाला अपघातात ग्रस्त अवस्थेत असतांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून त्यांचे नातेवाईक पोहचे पर्यंत थांबून मानवतेचे एक उदाहरण कायम केले.
सविस्तर वृत्त असे की,अचलपूर येथील राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर नारायणराव सुरपाटणे(57) राहणार परतवाडा 14 सप्टेंबर रोजी अमरावती येथे शिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यालयीन कामासाठी गेले.काम आटोपून ते आपल्या बहीनीकडे अमरावतीत जेवायला गेले.अचानक पाऊस जोरदार सुरु झाल्याने ते बहिनी कडेच राहून गेले,दुस-यादिवशी सकाळी आपल्या दुचाकीने अचलपूरला जाण्यास निघाले असता नागपूरीगेट जवळ मधात डुक्कर आले त्यामुळे त्यांचे नियंत्रण जावून रस्त्यावर पडले त्यात त्यांचे डोक्यावर मार लागून बेशुद्ध अवस्थेत पडले असता रस्त्याने जाणा-या अहसानभाई यांनी त्यांना पाहिले कुठलाच परीचय नसतांना काहीच विचार न करता त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या सुरपाटणे यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करून त्यांचे प्राण वाचवले.त्यानंतर त्यांचे कडे असलेल्या डायरी मधून अहसान भाई यांनी संबधित लोकांना संपर्क साधून या घटनेची माहिती दिली त्यांचे नातेवाईक पोहचेपर्यंत तेथेच थांबून आपले कर्तव्य पुर्ण केले.आता सुरपाटणेयांचेवर डाँ.सावदेकर यांच्या कडे उपचार सुरू आहेत सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहेत याचे खरे श्रेय अहसानभाईच्या परोपकाराला जाते.

Post a Comment