ढाका - बांगलादेशातील सिलहट जिल्ह्यातील काजोलशाह येथे
शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी इस्कॉन मंदिरात कीर्तन चालू असतांना टाळ-मृदंग
वाजल्याने धर्मांधांनी मंदिरावर आक्रमण केले. या वेळी दोन्हींकडून दगडफेक
करण्यात आली; मात्र येथे असणार्या पोलिसांनी लगेच त्यावर नियंत्रण
मिळवल्याने आणि मंदिराचे दार बंद असल्याने मोठी हानी टळली. यात ७ जण घायाळ
झाले आहेत. यातील ६ जण पोलिसांनी झाडलेल्या रबरी गोळ्यांमुळे घायाळ झाले
आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे.
Post a Comment