मुंबई - सध्या राज्यभरात आरक्षणाच्या मागणीसाठी निघत असलेल्या मराठा
मोर्च्यांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी
मुस्लिम समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. देशातील अन्य
समाजांप्रमाणे मुस्लिमांनाही न्याय मिळाला पाहिजे. मुस्लिमांनीही
आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढावेत आणि मराठ्यांप्रमाणे आपली एकजूट
दाखवून द्यावी, असे आझमी यांनी म्हटले आहे. दरम्यान, मराठा
मोर्च्यांप्रमाणे मुस्लिम समाजाचे मोर्चे काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या
आहेत. मोर्च्याच्या नियोजनसाठी आज मुंबईत एक बैठक पार पडणार आहे. अबू
आझमींसह मुस्लिम समाजातील नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आघाडी
सरकारच्या काळात मुस्लिम समाजाला शैक्षणिक व नोकर्यांमध्ये पाच टक्के
आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आला होता. परंतु, सत्ताबदल झाल्यानंतर युती
शासनाने हा अध्यादेश रद्द केला होता. मात्र, आता मराठा समाजाकडून काढण्यात
येत असलेल्या मोर्च्यांमुळे मुस्लिम समाजच्या आरक्षणाची मागणी पुन्हा जोर
पकडण्याची शक्यता आहे.
Post a Comment