अमरावती /-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. आज मध्य रात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्यात आल्या आहे. यापुढे ही दोन्ही नोटा चलनातून बंद झाल्या आहेत.
आज मध्यरात्रीपासून, म्हणजेच ८ नोव्हेंबरच्या १२ वाजल्यापासून ५०० रुपये आणि १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्या आहेत. तशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली. या निर्णयामुळे आज मध्यरात्रीनंतर ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांची किंमत केवळ कागदाचा तुकडा म्हणून राहणार आहे.
याची धास्ती आता अनेकांनी घ्यायला सुरवात केली आहे शहरातील गाडगे नगर भागात sbi चा ATM मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली जवळपास अंदाजे ३०० लोकानी ATM समोर रांगा लावल्या होत्या विशेष म्हणजे प्रत्येकाला १०० चा नोटा हव्या आहेत अस आढळून आले कारण प्रत्येक ग्राहक हा एकदा ATM मशीन जवळ पोहोचला कि ४ ते ५ दा व्यवहार करून प्रत्येक व्यवहाराला ४०० रुपयेच ATM मधून काढायचा प्रयत्न करीत आहे
Post a Comment