प्रमोद नैकेले /--
अचलपूर:-
अचलपूर:-
अचलपूर तालुक्यातील भिलोना येथील सारंग अतुल धर्माळे यांचा ३ आँगस्ट २०१४ मध्ये चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू झाला त्यांच्या या दुर्दैवी मृत्यू मुळे त्यांचे कुटुंबीयांना मोठया प्रमाणात नुकसान व दुख झाले त्यांचे पालकांना आर्थिक मदत म्हणुन राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत ७५००० रुपयांचा धनादेश हस्तांतरीत करण्यात आला.
सारंग हा स्थानीक राष्ट्रीय विद्यालयात २०१४/१५ मध्ये वर्ग सहावीत शिकत होता.त्याचे भिलोना गावी ३ आँगस्ट २०१४ रोजी शेतात जातांना चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू झाला.राष्ट्रीय विद्यालय अचलपूर येथून त्यांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात यावे असा प्रस्ताव शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांचे कडे सादर करण्यात आला त्याअनुशंगाने आज दिंनाक ७ नोव्हेंबर २०१६ रोजी त्यांची आई अर्चना व वडिल उमेश उर्फ अतुल धर्माळे यांना विद्यालयाचे कार्यालयात ७५००० रुपयांचा धनादेश पब्लिक वेलफेअर सोसायटी चे सचिव अनिलकुमार मदनगोपालजी चौधरी व शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद नैकेले यांचे हस्ते हस्तांतरीत करण्यात आला.याप्रसंगी वरिष्ठ लीपीक डी.एन.पारधी ,गजानन चव्हाण,अरूण सुने,कैलाश गायकवाड,राजेश केदारे,अजीत कोल्हे,राजेश जोशी व ग्रंथपाल निंभेकरमँडम उपस्थित होते.

Post a Comment