इटलीला बसलेला भूकंपाचा धक्का हा समलिंगी संबंधाला अनुमती दिल्याने देवाने दिलेली शिक्षा ! - इटलीचे धर्मगुरु
Posted by
vidarbha
on
11:30:00 PM
in
रोम
|
अंनिस आणि बुद्धीवादी यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
कि केवळ हिंदु धर्मावर टीका करणे हेच त्यांचे धोरण आहे ?
रोम - नुकताच इटलीला ६.६ रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा बसलेला धक्का, त्यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडणे आणि सहस्रावधी लोक बेघर होणे, ही कुटुंब व्यवस्था आणि विवाहाची प्रतिष्ठा यांचा अवमान करणार्या समलिंगी संबंधाला इटली सरकारने अनुमती दिल्याने दैवी शिक्षा आहे, असे इटलीचे ख्रिस्ती धर्मगुरु जिओवानी कॅवॅलकोली यांनी म्हटले आहे. ३० ऑक्टोबर या दिवशी मध्य इटलीला बसलेला भूकंपाचा धक्का हा गेल्या ३६ वर्षांतील सर्वांत अधिक तीव्रतेचा धक्का होता. गेल्या २ महिन्यांत मध्य इटलीला बसलेला भूकंपाचा हा तिसरा मोठा धक्का होता. व्हॅटिकनचे आर्चबिशप आग्नेलो बेस्यु यांनी कॅवॅलकोली यांचे विधान अवमानकारक असल्याचे म्हटले आहे; मात्र कॅवॅलकोली त्यांच्या विधानाशी ठाम आहेत. मानवाच्या पापामुळेच भूकंपासारखी संकटे येत असतात. व्हॅटिकनने ख्रिस्ती धर्मामध्ये प्रश्नोत्तराद्वारे दिलेल्या शिक्षणाचा अभ्यास करावा, असे कॅवॅलकोली यांनी म्हटले आहे.
Post a Comment