अंनिसला याविषयी काय म्हणायचे आहे ?
- तेलंगण राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे राज्यातील ‘सैफाबाद पॅलेस’ ही इमारत तोडून तेथे ३४७ कोटी रुपये खर्च करून नवीन इमारत बांधणार आहेत. कारण वर्ष १८८८ मध्ये बांधण्यात आलेली ही इमारत राज्यासाठी अशुभ आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. याचे बांधकाम सहावा निजाम महबूब अली पाशा याने केले होते; मात्र नंतर त्याने या इमारतीला टाळे लावले होते. तेव्हापासून तिला अशुभ म्हटले जाते. वर्ष १९४० मध्ये सरकारमधील एका वरिष्ठ अधिकार्याने या इमारतीत प्रशासकीय कार्यालय स्थापन केले.
बीबीसी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत चंद्रशेखर राव म्हणाले की, ही इमारत नक्कीच अशुभ आहे. म्हणून येथे कोणाचीच प्रगती होत नाही. हे एक ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे तेलंगण त्याचा परिणाम भोगायला सिद्ध नाही. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते शाबिर अली यांनी म्हटले की, जर मुख्यमंत्री वास्तूदोषामुळे नवीन इमारत बांधत असतील, तर ती करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी आहे.
या संदर्भात विरोधी पक्षातील एका आमदाराने हैदराबाद उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. न्यायालयाने सरकारच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे. सरकारने न्यायालयाला सांगितले की, आग लागण्याच्या धोक्यामुळे ही इमारत पाडून नवीन बांधण्यात येत आहे.
Post a Comment