अश्लील चित्रपटांमुळे (पॉर्नमुळे) काय घडू शकतो, हे भारतात ते
पहाण्याचे समर्थन करणारे जाणतील का ? कि याचेही ते समर्थनच करणार ?
लंडन - ब्रिटनमध्ये १२ वर्षांच्या मुलाने ‘इन्सेस्ट पॉर्न’ (कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांच्यातील शारीरिक संबंध दाखवणारे अश्लील चित्रपट) पाहून स्वतःच्या ७ वर्षांच्या बहिणीवर अनेकदा बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २ वर्षांपूर्वीची आहे. आता या मुलाचे वय १४ वर्षे आहे. त्याने संकेतस्थळावर हा अश्लील चित्रपट पाहिला होता. या संदर्भात न्यायालयात खटला चालू आहे.
अधिवक्ता इयान फेनी यांनी म्हटले की, अशा प्रकारच्या घटनांत वाढ होण्याची शक्यता आहे; कारण संकेतस्थळांमुळे असे चित्रपट पाहाणार्या युवकांच्या संख्येत वाढ होऊ शकते. ही एकमेव घटना नाही, तर अनेक घटना घडल्या आहेत. या घटनेत मुलगा निर्धास्त होता की, ही घटना कोणाला समजणार नाही; मात्र मुलीने आईला सांगितल्यावर ते उघडकीस आले.
Post a Comment