११ डिसेंबर या दिवशी कोल्हापूर येथे होणार्या हिंदु धर्मजागृती
सभेच्या आयोजनाच्या बैठकीस ५५ हून अधिक हिंदु धर्माभिमान्यांची उपस्थिती !
![]() |
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाडये |
![]() |
सभा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी भवानीदेवीचा आशीर्वाद घेतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये (१) |
कोल्हापूर - आज हिंदु धर्म आणि भारत देश यांवर विविध माध्यमांतून आघात होत आहेत. वर्ष १९९० मध्ये काश्मिरी हिंदु महिलांवर झालेल्या अत्याचारांमुळे आणि हिंदूंच्या कत्तलीमुळे हिंदूंना तेथून पलायन करावे लागले. त्यामुळे आपल्या देशातील काश्मिरी हिंदु बांधवांना आज विस्थापित जीवन जगण्याची पाळी आली आहे. आता या हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनवर्सन होण्यासाठी ‘'पनून काश्मीर'’ची निर्मिती अपरिहार्य ठरते. असे होणे ही हिंदु राष्ट्राची पहिली पायरी असेल. त्याचे आपण साक्षीदार नव्हे, तर भागीदार बनण्याची संधी आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी व्यक्त केले. कोल्हापूर येथे ११ डिसेंबर या दिवशी भव्य हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या आयोजनासाठी ६ नोव्हेंबर या दिवशी श्री पंचमुखी गणेश मंदिर येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीसाठी ५५ हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.
श्री. मनोज खाडये पुढे म्हणाले, "‘‘हा देश हिंदुबहुल असूनही या देशात अनेक ठिकाणी हिंदूंची अवहेलना होत आहे. जेथे जेथे धर्मांध बहुसंख्य आहेत, त्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात ‘'छोटे पाकिस्तान’' निर्माण झाले आहेत. यांसाठी हिंदूंनी संघटित होणे अत्यावश्यक आहे."’’ बैठकीचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी सांगितला.
या वेळी उपस्थित हिंदु धर्माभिमान्यांनी ठरवलेला कृतीशील कार्यक्रम....
१. शिवसेना युवासेनेचे जिल्हा समन्वयक श्री. रणजित आयरेकर यांनी शहरातील ४० महाविद्यालयांत जाऊन प्रसार करू, फलक लावू, तसेच शहर आणि अन्य ४५ गावात वृत्तपत्र वितरकांच्या माध्यमातून सभेचा विषय लोकांपर्यंत पोेचवू, असे सांगितले.
२. शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी उचगाव, तसेच या परिसरातील १५ गावांत बैठका घेऊन जागृती करू, तसेच धान्य अर्पण करण्यासाठी साहाय्य करू, असे सांगितले.
३. शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे यांनी कागल तालुका आणि अन्य तालुक्यांतील गावात बैठका घेऊन जागृती करू, असे सांगितले. त्यासमवेत मुरुगुड, म्हाकवे, गोरंबे, चिखली आदी गावांत बैठका घेऊ, असेही सांगितले.
४. कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण संघटनेनेच श्री. स्वानंद कुलकर्णी यांनी हा विषय संघटनेतील सर्वांपर्यंत पोचवू, असे सांगितले.
उपस्थित मान्यवर
कोल्हापूर शिवसेना उपशहरप्रमुख श्री. शशिकांत बीडकर, विश्व हिंदु परिषद शहरप्रमुख श्री. अशोक रामचंदानी, जय शिवराय तरुण मंडळाचे संस्थापक श्री. किशोर माने आणि श्री. ऋतुराज माने, उचगाव ग्रामपंचायत सदस्य श्री. विनय करी, विश्व हिंदु परिषदेचे श्री. शशिकांत पाटील, शिये येथील सर्वश्री शिवाजी पाटील, उत्तम पाटील आणि मारुति पाटील, श्री महालक्ष्मी अन्नछत्र मंडळ, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाचे श्री. मयुर तांबे, हिंदु धर्माभिमानी सर्वश्री रमेश शिंदे, विनोद भोसले, शिवराज भोसले, रघुनाथ अंकारे, सचिन मेंच, निखिल कांबळे, चंद्रशेखर गुरव, रणरागिणी शाखेच्या सौ. अंजली कोटगी, सौ. संगीता कडूकर यांसह हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे साधक उपस्थित होते.
आभार
१. श्री पंचमुखी गणेश मंदिराच्या विश्वस्तांनी बैठकीसाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.
महालक्ष्मी आणि भवानी देवीची ओटी भरून सभेच्या प्रसारास आरंभ !
सभेच्या निमित्ताने ७ नोव्हेंबर कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी, तसेच भवानी देवीची ओटी भरून सभा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या उपस्थितीत प्रार्थना करण्यात आली आणि हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारास आरंभ करण्यात आला. या वेळी पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, हिंदु एकताचे श्री. शिवाजीराव ससे यांसह अन्य उपस्थित होते.
Post a Comment