BREAKING NEWS

Wednesday, November 9, 2016

शहराचा सर्वांगीण विकासाकरीता व सर्वसामान्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी माझी उमेदवारी


विदर्भ24न्यूज च्या  प्रतिनिधीला नगराध्यक्षपदाचे उमेदवार नितीन गवळींची खास मुलाखात

न.प. शाळांमध्ये केजी१, केजी२ तसेच उर्दु ज्युनिअर कॉलेज उघडण्याचा मानस !

चांदुर रेल्वे- - (शहेजाद खान)- 


चांदुर रेल्वे नगरपरीषदेच्या अध्यक्षपदासाठी चुरशीची निवडणुक होणार असुन या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, भारतीय जनता पार्टी, तिसरी आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षसुध्दा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. तिसऱ्या आघाडीचे उमेदवार नितीन गवळी यांनी अन्य पक्षांच्या उमेदवारांपुढे तगडे आव्हान उभे केले असुन चांदुर रेल्वे शहराच्या सर्वांगिण विकासासाठी, भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक प्रशासन तसेच सामान्य नागरीकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे नितीन गवळी यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
        कला शिक्षकाची पदविका प्राप्त केलेले नितीन गवळी गेल्या १५ वर्षांपासुन राजकीय क्षेत्राशी संबंधित आहेत.  नितीन गवळींनी सन २००६ ते २०११ या पाच वर्षांत अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समीतीचे तालुक्याचे सरचिटणीसपद भुषविले. यासोबतच २००६ पासुन २०१५ पर्यंत हुतात्मा भाऊगिर वाचनालयाचे संचालकपदाचा कारभार पाहिला. ते संचालकपदी जनतेतुनच निवडणुन आले होते. २०११ मध्ये ते अपक्ष नगरसेवक म्हणुन निवडुन येऊन अडीच वर्षे नगरपरीषदेच्या उपाध्यक्षपदी विराजमान झाले होते. याव्यतीरीक्त २०१२ मध्ये आम आदमी पक्षाच्या जिल्हा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली होती. पक्षाने त्यांच्यावर थेट जिल्ह्याची जबाबदारी दिली होती. त्यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ पाहता त्यांची २०१५ मध्ये आम आदमी पक्षांच्या विदर्भ कार्यकारीणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. यानंतर २०१३ मध्ये अडीच वर्षांकरीता नगरपरीषदेचे शिक्षण, आरोग्य व स्वच्छता सभापतीपद भूषविले. मागील पाच वर्षांत नितीन गवळी हे एकमेव सक्रीय नगरसेवक आहेत. यासोबतच ते अकोला जनता बैंकेच्या संचालकपदावर आजही विराजमान आहे. त्यामुळे असे विविध पद भूषविणारे नितीन गवळी हे चांदुर रेल्वे परीसरात एक उत्तम व्यक्तीमत्व म्हणुन परीचित असुन त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे. शहरात सर्वसामान्यांच्या भेडसावणाऱ्या समस्या आज देखील जैसे थे अाहे. शहराच्या सर्वांगिण विकासाकरीता व चांदुर रेल्वे नगरपरीषद क्रमांक १ वर नेण्याकरीता आपण नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या मैदानात उतरल्याचे नितीन गवळींनी सांगितले.
          गोरगरीबांसाठी, सर्वसामान्य नागरीकांसाठी तसेच अपंग बांधवांसाठी केलेले कार्य आपणास या निवडणुकीत तारणार असुन आपण नक्कीच विजयी होवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्ष म्हणुन विजयी झाल्यास सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न करण्यास व अपंगांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य राहणार आहे. तसेच भ्रष्टाचार मुक्त, सक्त पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन व विकास निधी एक रूपयाही खर्च न करता संपुर्ण शहरात एलईडी लाईट बसविण्याचा मानस आहे. याव्यतीरीक्त शिक्षण क्षेत्रामध्ये नगरपरीषदधील शाळांमध्ये केजी १, केजी २ तसेच उर्दु शाळेमध्ये ११ वी व १२ वी वर्ग सुरू करणे या दोन बाबींवर मुख्य लक्ष केंद्रीत करणार असल्याचे नितीन गवळींनी सांगितले. शहराला स्वच्छ व सुंदर बनविने यासोबतच शहरातील विविध कामे करण्यावरही लक्ष केंद्रीत करणार आहो. नितीन गवळी यांच्या रूपाने तिसऱ्या आघाडीने एक तगडा उमेदवार रिंगणात उतरविला असुन त्यांच्या उमेदवारीमुळे अनेक मोठ्या नेत्यांचे धाबे दणाणल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. प्रचारामध्येही नितीन गवळी आघाडीवरही  असल्याचे समजते

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.