चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-
स्थानिक नगर परीषदेची निवडणुक येत्या २७ नोव्हेंबलला होत असुन या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी निवडणुक थेट जनतेतुन होणार असुन ६ उमेदवार निवडणुक रिंगणात आहे. यामध्ये शिवसेना, भारीप- बमस, रीपाई प्रणित अपक्ष उमेदवार निलेश विश्वकर्मा, कॉंग्रेसचे शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी, भाजपचे प्रमोद नागमोते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणेश रॉय, तिसऱ्या आघाडीचे नितीन गवळी, व अपक्ष नंदकिशोर खेरडे यांचा समावेश आहे. खऱ्या अर्थाने आता चांदुर रेल्वेत तिहेरी लढतीचे चिन्हे दिसत असुन अपक्ष उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्यासोबत कॉंग्रेस, भाजप उमेदवार यांचा जोर दिसत आहे. परंतु जस जसा प्रचार संपण्याचा व निवडणुकीचा दिवस जवळ येईल तसे अजु चित्र स्पष्ट होऊ शकते. यामुळे आता खऱ्या लढतीला सुरूवात झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे..
गुलाबी थंडीत निवडणूक होत असल्याने कार्यकर्त्यांत भर थंडीतही सकाळपासुनच प्रचार करीत रस्त्यावरून फिरावे लागत आहे. काही दिवसांपासून शहरात शिवसेना, भारीप ब. महासंघ, प्रहारचे समर्थीत अपक्ष उमेदवार निलेश विश्वकर्मा ८ ही प्रभाग 'डोअर टू डोअर' प्रचार करीत असुन ठिकठिकाणी बैठका घेत आहेत. विश्वकर्मा प्रत्येक मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेत असुन त्यांना जनतेचा वाढता पाठींबा मिळत आहे. गेल्या १८ वर्षांपासुन समाजकारण व राजकारणात काम करणाऱ्या निलेश विश्वकर्मा यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा, बचत गट मार्गदर्शन मेळावा आयोजित करून आपली एक वेगळी ओळख निर्मान केली असुन ते सर्वसामान्यांच्या समस्यांसाठी झटणारे एक उमदे नेतृत्व आहे. संदर, स्वच्छ व समृध्द शहर हा आपला विकासाचा अजेंडा असुन नगराध्यक्ष म्हणुन निवडुन आल्यास आपल्या अजेंड्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार असल्याचे निलेश विश्वकर्मांनी सांगितले.
Post a Comment