अकोला - अधिवक्त्यांचा हिंदु विधीज्ञ परिषदेत सहभाग वाढावा,
या दृष्टीने प्रयत्नशील असलेले येथील अधिवक्ता पप्पूभाऊ मोरवाल हे अकोला
जिल्हा कुडो असोशियनचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय
खेळाडूंनीही धर्मकार्यात सहभाग घ्यावा, या उद्देशाने जलाराम मंदिर येथे
राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यात श्री. ऋषिकेश
काळे, श्री. ईशान पाटील, श्री. आदित्य धोटे, श्री. आकाश यादव, तसेच त्यांना
मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक काळा पट्टा (ब्लॅक बेल्ट) मिळवलेले
आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री. मनोज अंबेरे यांचा सत्कार केला गेला. सर्व
अधिवक्ता श्री. शर्मा, श्री. कोठारी, श्री. तिवारी, श्री. गोरे आणि सौ.
गावंडे यांनी प्राविण्यप्राप्त खेळाडूंचा सत्कार केला.
हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी
राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची माहिती उपस्थितांना करून दिली. तसेच
स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकताही विशद करून धर्मकार्यात कसे सहभागी होऊ
शकता, हे सांगितले. या वेळी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्याक्षिके करून
दाखवण्यात आली.
सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक श्री. अंबेरे म्हणाले की, आम्ही समितीच्या
माध्यमातून धर्मकार्याला प्रारंभ करतो. स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर किंवा
वर्ग यांतही आम्ही सहभागी होऊ. आमची संघटनाही समितीच्या समवेत कार्य करेल.
Post a Comment