BREAKING NEWS

Tuesday, November 22, 2016

हिंदुत्वनिष्ठांचे शासन असूनही हिंदुत्वनिष्ठांच्या मारेकर्‍यांवर कारवाई होत नसेल, तर कुणाकडून अपेक्षा करणार ? - श्री. अमोल कुलकर्णी, संतश्री आसारामबापू साधक परिवार

भोसरी (पुणे) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
 
 
     भोसरी (जिल्हा पुणे) - साम्यवाद्यांच्या हत्या झाल्यावर विशेष तपास पथकाची स्थापना केली जाते, तसेच सीबीआय चौकशीही करण्यात येते. त्याचप्रमाणे हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचीही चौकशी करा. हिंदुत्वनिष्ठांचेे शासन असून हिंदुत्वनिष्ठांच्या मारेकर्‍यांवर कारवाई होत नाही, मग अपेक्षा कोणाकडून करायची, या हत्यांविषयी प्रसारमाध्यमांनीही मौन बाळगले आहे, असे प्रतिपादन पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू साधक परिवाराचे श्री. अमोल कुलकर्णी यांनी २० नोव्हेंबर या दिवशी येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केले. या आंदोलनाला २५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
      या वेळी आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांना भारतात आणावे आणि पीस स्कूलच्या सर्व शाळांवर बंदी घालावी, बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करावी. कर्नाटक आणि केरळ येथे होणार्‍या हिंदु नेत्यांच्या हत्या आणि आक्रमणांमागील षड्यंत्राचा केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून सखोल तपास व्हावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. 
     आंदोलन चालू असतांना उपस्थित हिंदूंनी उत्स्फूर्तपणे आंदोलनातील मागण्यांना अनुमोदन दर्शवण्यासाठी निवेदनावर स्वाक्षर्‍या केल्या. आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते श्री. कार्तिक स्वामी, श्री. बबनराव निकाळजे आणि श्री योग वेदांत सेवा समितीचे अधिवक्ता गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.
अन्य मान्यवरांचे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा ! 
- श्री. गणेश लांडगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
     हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून त्यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. त्यासाठी पुष्कळ आंदोलने घेण्यात येऊनही प्रसारमाध्यमे त्यांची नोंद घेत नाहीत. हिंदु जनजागृती समितीच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
हिंदू अडचणीत असतांना शासनाने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायला हवे ! 
- श्री. तुकाराम पडवळे, भाजप
     आज हिंदू अडीअडचणीत सापडला आहे. त्याच्या पाठीशी शासनाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आपल्याच देशात हिंदूंवर अत्याचार होतात, हे दुर्दैव आहे. माझ्या संघटनेच्या वतीने माझा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे.
हिंदु नेत्यांच्या हत्येसंदर्भात केंद्रशासनाने हस्तक्षेप करावा ! - श्री. शंभू गवारे, सनातन संस्था
    ‘इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’ या संस्थेवर केंद्रसरकारने बंदी आणली, ही अभिनंदनीय कृती आहे; पण शासनाने येथेच न थांबता झाकीर नाईक ज्या देशात लपला आहे, तेथून त्याला शोधून आणावे. त्याची कठोर चौकशी करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. संघटनेला मिळणारे पैसे कोठून येतात आणि ते कोठे वापरले जातात, याचीही कसून चौकशी झाली पाहिजे. हिंदुत्वनिष्ठांच्या हत्येप्रकरणी केरळमधील राज्य शासन कोणतीही ठोस पावले उचलत नाही. अशाच घटना कर्नाटक आणि बंगाल येथेही घडत आहेत. त्यामुळे केंद्रशासनाने यात हस्तक्षेप करून दोषी साम्यवादी आणि धर्मांध यांना अटक करावी. 
हिंदु नेत्यांच्या झालेल्या हत्यांच्या संदर्भात केंद्रशासनाने सीबीआय चौकशी करावी ! 
- श्री. नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती
     आज हिंदु नेत्यांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात हत्या होत असतांनाही पोलीस आणि प्रशासन मूग गिळून गप्प आहे. म्हणून न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. मोदी शासनाला विनंती आहे की, या प्रकरणाची सखोल सीबीआय चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. साम्यवाद्यांच्या हत्या झाल्या, तर त्यांना वारेमाप प्रसिद्धी दिली जाते. हेच हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांच्या संदर्भात कोणत्याच प्रसिद्धीमाध्यमांना करावेसे वाटत नाही. गोरक्षक प्रशांत पुजारी याची अतिशय क्रूर हत्या झाली. त्याविषयीही कुणी आवाज उठवला नाही. मुसलमान धर्माचा प्रचार करण्यासाठी स्थापन झालेल्या पीस टीव्हीवर हिंदु देवदेवतांची निंदानालस्ती केली जाते. हेही थांबायला हवे. 
क्षणचित्रे 
१. अनेक युवकांनी आंदोलनाची छायाचित्रे काढली. 
२. काही नागरिकांनी आंदोलनस्थळी ठेवलेल्या श्रीकृष्णाच्या प्रतिमेला भावपूर्ण नमस्कार केला.
३. आंदोलनाच्या मध्यभागी प्रतिकात्मक हिंदु नेत्याची हत्या झाल्याचे दाखवले होते.
४. आंदोलनस्थळी पिवळा आणि भगवा या रंगांचे कपडे परिधान केलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या कपड्यांवर आणि तेथील फलकावर काळे छोटे किडे आढळले. अन्य रंगाच्या कपड्यांवर हे किडे नव्हते.

Share this:

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.